शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

दारू दुकानाचा परवाना देण्यावरून फसवणूक, राज्य गुन्हे शाखेच्या पुणे अप्पर पोलीस अधीक्षकांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 12:24 IST

महाबळेश्वर येथील हॉटेल व्यावसायिकाची फसवणूक : वाई पोलिसांत गुन्हा दाखल

वाई : वाइन्स शॉप्सचा परवाना मिळवून देण्याचे आश्वासन देऊन त्याच्या खर्चासाठी एक कोटी पाच लाख रुपयांची रक्कम घेऊन महाबळेश्वर येथील हॉटेल व्यावसायिकाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी राज्य गुन्हे शाखेचे अपर पोलिस अधीक्षक (पुणे विभाग) श्रीकांत कोल्हापुरे यांच्यासह नऊजणांवर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा झाला आहे. यामुळे पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.याबाबत मध्यस्थ संजय साळुंखे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत पुणे विभाग आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक देवश्री मोहिते यांनी सोमवारी (ता. १५) वाई पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये महाबळेश्वर (साबणेरोड) येथील मेघदूत हॉटेलचे मालक हेमंत बाळकृष्ण साळवी यांना राज्य गुन्हे अन्वेषण शाखा पुणे विभाग अपर पोलिस अधीक्षक (ए.ट.प.) श्रीकांत कोल्हापुरे, हनुमंत विष्णुदास मुंडे व विवेक पंडित यांनी फिली-चिली वाइन्स शॉपचा परवाना मिळवून देण्याचे आश्वासन देऊन त्यासाठी एकूण अडीच कोटी रुपयांची मागणी केली.

या कामाकरिता वेळोवेळी संजय बाजीराव साळुंखे यांच्या मध्यस्थीने एकूण रक्कम १ कोटी ५० लाख रुपये रोख व चेकने वाई येथे विविध ठिकाणी स्वीकारली. परंतु त्यांना आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे लायसन्स मिळवून दिले नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे संजय सांळुखे यांनी अपर पोलिस महासंचालक, पुणे यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता. या अर्जाच्या चौकशीनंतर सदर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आला आहे.या अर्जानुसार अपर पोलिस अधीक्षक (ए.ट.प.) श्रीकांत कोल्हापुरे व हनुमंत मुंडे यांच्यासह नीलेश पटेल, अभिमन्यू देडगे, विवेक पंडित, राजन सूर्यभान सोनवणे, शकील हाजी मकबूल, सय्यद श्रीमती नजमा शेख व बाळू पुरी अशा नऊजणांवर आपापसात संगनमत करून, शासकीय वाहनाचे लॉक बुकमध्ये खोट्या नोंदी करून, हेमंत साळवी यांच्या आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी वाई पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पुणे विभाग आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी करीत असल्याची माहिती वाई पोलिसांनी दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwai-acवाईPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी