तरुणांनी बनवले अजिंक्यतारा अॅप, सातारकरांना जोडणारा दुवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 12:02 IST2019-05-04T11:59:35+5:302019-05-04T12:02:12+5:30
सातारकर म्हणजे मेहनती, खूप कष्ट करणारे आत्मविश्वासू, समाजाच्या प्रगतीसाठी काम करणारे स्वत:ला झोकून देणारे लोक अशी ओळख जागतिक स्तरावर आहे... ही ओळख आणखी दृढ करण्यासाठी कोण ना कोण सातारकर सातत्याने प्रयत्न करत असतात, त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे तारळे खोऱ्यातील जोतिराम सपकाळ आणि रजनीकांत पवार.

तरुणांनी बनवले अजिंक्यतारा अॅप, सातारकरांना जोडणारा दुवा
सागर गुजर
सातारा : सातारकर म्हणजे मेहनती, खूप कष्ट करणारे आत्मविश्वासू, समाजाच्या प्रगतीसाठी काम करणारे स्वत:ला झोकून देणारे लोक अशी ओळख जागतिक स्तरावर आहे... ही ओळख आणखी दृढ करण्यासाठी कोण ना कोण सातारकर सातत्याने प्रयत्न करत असतात, त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे तारळे खोऱ्यातील जोतिराम सपकाळ आणि रजनीकांत पवार.
माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, मुरुडमधून घेतले. तसेच आपले बारावीपर्यंतचे शिक्षण खेडेगावात राहून पूर्ण केले, तसेच पुढील शिक्षण नोकरी करत करत मुंबईमधून पूर्ण केले. काही वर्षे नोकरी आणि नंतर स्वत:चा व्यवसाय सुरू केला.
सातारकर विद्यार्थी, तरुण, शेतकरी, गृहिणी, नोकरदार आणि उद्योजक यांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणणारे अजिंक्यतारा - कनेक्टींग सातारकर अॅप सुरू केले आहे. या अॅपची वैशिष्ट्ये म्हणजे अजिंक्यतारा - कनेक्टींग सातारकर हे सातारकर समुदायासाठी तयार केलेले जगातील पहिले लोकल सर्च इंजिन आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तब्बल ८५0 लोकांनी हे अॅप डाऊनलोड केले.
अजिंक्यतारा - कनेक्टींग सातारकरचा उद्देश एका सातारकराचे दुसऱ्या सातारकरासोबत विश्वासाचे नाते प्रस्थापित होत आहे. या अॅपचा फायदा शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी, गृहिणी या सर्वांनाच होईल, असा विश्वास उद्योजक हणमंतराव गायकवाड, चिन्मय कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.
अजिंक्यतारा-कनेक्टिंग सातारकर मिशन
सातारकरांना वेगवान, विनामूल्य, विश्वासार्ह आणि व्यापक माहिती उपलब्ध करून देणे आणि सातारकर उद्योजकांना इतर सातारकर बरोबर कनेक्ट करणे, हे मिशन या माध्यमातून साध्य केले जाणार आहे.
शेतीमालालाही बाजारपेठेत मिळणार
सातारकर मग तो मुंबईत राहतो की काश्मिरमध्ये! तो व्यवसाय काय करतो?, याची इतंभूत माहिती या अॅपवर आहे. मुंबईत गेल्यानंतर टॅक्सी चालक सातारचाच शोधून सुरक्षितपणे इच्छित स्थळी पोहोचणे सोपे होणार आहे. जिल्ह्यातील ताजा शेतीमालही विकणे सोपे जाणार आहे.