कोरेगावात पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे कातकरी समाजातील युवकाचे वाचले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:41 IST2021-09-11T04:41:36+5:302021-09-11T04:41:36+5:30
कोरेगाव : कोरेगाव शहरात ऐन गणेशोत्सवाच्या दिवशी फिट येऊन रस्त्यावर निपचित पडलेल्या कातकरी समाजातील युवकाला पोलीस जवानांनी प्रसंगावधान राखत ...

कोरेगावात पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे कातकरी समाजातील युवकाचे वाचले प्राण
कोरेगाव : कोरेगाव शहरात ऐन गणेशोत्सवाच्या दिवशी फिट येऊन रस्त्यावर निपचित पडलेल्या कातकरी समाजातील युवकाला पोलीस जवानांनी प्रसंगावधान राखत उपचारासाठी दाखल केले, त्यामुळे त्याचे प्राण वाचले.
मार्केट यार्डच्या पिछाडीस असलेल्या कातकरी वसाहतीतील युवकाला शुक्रवारी सायंकाळी आझाद चौकात अचानक फिट आल्याने तो रस्त्यावर निपचित पडला. त्याचवेळी वाहतूक नियंत्रणाचे काम करणारे पोलीस जवान महेश जाधव, धनाजी कदम यांच्यासह गृहरक्षक दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत तातडीने रुग्णवाहिका बोलावून घेत, त्याला उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
वाहतूक शाखेच्या जवानांसह पोलीस मुख्यालयातील स्ट्रायकिंग फोर्सचे जवान देखील या मदत कार्यात पुढे होते. पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.