हाथरसप्रकरणी पंतप्रधानांना पत्र : महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 04:19 PM2020-10-08T16:19:07+5:302020-10-08T16:22:53+5:30

Hathras Gangrape , sataranews, ncp समाजात वाढलेल्या अत्याचाराच्या विकृतीने महिलांचे प्राण जाणं चुकीचं आहे. ही विकृती मुळापासून बाहेर काढणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे. देशात ठोस कायद्यांबरोबरच त्यांच्या योग्य अंमलबजावणीची गरज आहे. हाथरस प्रकरणात पोलिसांनी घेतलेली भूमिका आरोपींचे बळ वाढविणरी आहे. याबाबींकडे तातडीने लक्ष देऊन हाथरसप्रकरणी पीडितेला तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्य ावतीने पंतप्रधानांना पत्राद्वारे करण्यात आली आहे.

Letter to the Prime Minister on the Hathras case: Women Nationalist Congress Party is aggressive | हाथरसप्रकरणी पंतप्रधानांना पत्र : महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक

हाथरसप्रकरणी पंतप्रधानांना पत्र : महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक

Next
ठळक मुद्देहाथरसप्रकरणी पंतप्रधानांना पत्र तातडीने न्याय मिळावा : महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक

सातारा : समाजात वाढलेल्या अत्याचाराच्या विकृतीने महिलांचे प्राण जाणं चुकीचं आहे. ही विकृती मुळापासून बाहेर काढणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे. देशात ठोस कायद्यांबरोबरच त्यांच्या योग्य अंमलबजावणीची गरज आहे. हाथरस प्रकरणात पोलिसांनी घेतलेली भूमिका आरोपींचे बळ वाढविणरी आहे. याबाबींकडे तातडीने लक्ष देऊन हाथरसप्रकरणी पीडितेला तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्य ावतीने पंतप्रधानांना पत्राद्वारे करण्यात आली आहे.

पत्रात नमूद केले आहे की, हाथरस प्रकरणातील आरोपींवर तातडीने कायदेशीर कारवाई करून त्यांना शिक्षा नाही दिली तर गैरकृत्य करणाऱ्यांचे मनोधैर्य वाढेल. लाल किल्ल्यावरून महिलांच्या शौचालय आणि सुरक्षितता या मुद्द्यांवर आवाज उठवून काम भागणार नाही.

आता महिला संरक्षणासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी अपेक्षित आहे. भविष्यात कोणत्याही महिलेवर अशी वेळ येऊ नये, यासाठी देशाचे प्रमुख तुमचं कर्तव्य सर्वात उच्चस्थानी आहे. महिला सुरक्षेच्या अनुषंगाने ठोस पावले उचलली जावीत.

पंतप्रधानांना शंभर पोस्टकार्ड संदेश पाठविण्यात आले. यावेळी महिलाध्यक्षा समिंद्रा जाधव, युवती प्रदेश सचिव स्मिता देशमुख, रागिनी अहिवळे, पूजा काळे, मृण्मयी जाधव, कुसूमताई भोसले, सुवर्णा पवार, उषा पाटील,रशिदा शेख, संजना जगदाळे उपस्थित होते.

Web Title: Letter to the Prime Minister on the Hathras case: Women Nationalist Congress Party is aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.