शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

जे पाजतील नवऱ्याला दारू त्याला निवडणुकीत नोटा मारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:39 IST

सातारा : निवडणुकीत मतदारांना दारूचे आमिष दाखवून पार्ट्या देणा-या नेत्यांच्या विरोधात दारूमुक्ती आंदोलनाने मोहीम सुरू केली आहे. ‘जे पाजतील ...

सातारा : निवडणुकीत मतदारांना दारूचे आमिष दाखवून पार्ट्या देणा-या नेत्यांच्या विरोधात दारूमुक्ती आंदोलनाने मोहीम सुरू केली आहे. ‘जे पाजतील नव-याला दारू, त्याला निवडणुकीत नोटा मारू’ असे फलक आणि पत्रकांचे वाटप करून मतदारांमध्ये जागृती करण्याचे संघटनेने ठरवले आहे.

राज्यात सुमारे १२ हजार गावांत व मोठ्या संख्येने स्थानिक स्वराज्य संस्था, नगर पंचायती आदी ठिकाणी निवडणूक जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीमध्ये उमेदवार व त्यांचे पाठीराखे राजकीय पक्षाचे नेते मतदारांना विविध आमिषे दाखवितात; मटण व दारू सर्रास पाजतात. निवडणूक कालखंडात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असते. युवकांनाही दारू पाजून ते व्यसनाच्या आहारी जाऊन, व्यसनी होतात. हे चित्र प्रत्येक निवडणुकीत बघायला मिळते.

राज्यातील निवडणूक कालखंडात निवडणूक होणा-या क्षेत्रात अवैध व वैध दारू विक्रीला नियंत्रण राहावे यासाठी दारूबंदीसाठी काम करणा-या राज्यातील संस्था, संघटनांनी राज्य निवडणूक आयुक्त, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, उत्पादन शुक्ल विभागाला निवेदने पाठविली आहेत. निवडणूक कालखंडात निवडणूक क्षेत्रात पूर्णपणे दारू विक्रीवर नियंत्रण, गावात पोलीसांचा पहारा, परिसरातील बियर शॉपी, दारू दुकाने, धाबे नियमबाह्य दारू विक्री करणार नाहीत, रात्री उघडे ठेवणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. अनेक महिला संस्था, संघटनांनी गाव परिसरात ‘जे पाजतील माझ्या नव-याला दारू, त्या उमेदवारांना नोटा मारू, जे पक्ष पाजतील दारू-त्यांना कधीच मतदान ना करू’ अशी प्रचार पत्रके काढून, फलक लावून मिरवणूक गावात काढणार आहेत. या उपक्रमात दारूमुक्ती आंदोलनाचे महाराष्ट्रातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सहभागी होणार आहेत.

या आंदोलनाचे संयोजन भाई रजनीकांत यांनी केले आहे. जिल्हानिहाय जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. या अंतर्गत वर्धाला पुष्पा झाडे, यवतमाळला रवी गावंडे, दिलीप भोयर, वाशिम मदन येवले, अकोला राहुल राऊत, राज्य संघटिका रत्नाबाई खंडारे, बुलडाणा अ‍ॅड. रत्नमाला गवई, लताबाई राजपूत; व्यसनमुक्ती राज्य सन्मान पुरस्कार प्राप्त माया धांडे, हिंगोली विशाल अग्रवाल, सातारा अ‍ॅड. वर्षा देशपांडे, शालिनीबाई वाघमारे, पुणे विभागीय संघटक अ‍ॅड. संतोष मस्के, अहमदनगर देवराव अंभोरे, नांदेड बळवंतराव मोरे, अमरावती डॉ. धर्मेंद्र राजपूत, नरेंद्र बैस, रायगड-संतोष ढोरे, गडचिरोली सर्च संस्था, मुक्तिपथ दल, डॉ. अभय बंग, भारतीय जनसंसद अहमदनगरचे प्रदेश अध्यक्ष अशोक सब्बन, हेरंब कुलकर्णी, अ‍ॅड. रंजना गवांदे आदी संस्थेचे प्रमुख सहभागी आहेत.

कोट :

लोकशाही मानणा-या आणि मतदानाचा हक्क बजावणा-या मतदाराला मतासाठी दारूचे आमिष दाखविण्याचे फॅड कुटुंबातल्या महिलांसाठी घातक ठरत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकींपासूनच या पध्दतीवर अंकुश आणण्याचा प्रयत्न यातून होणार आहे.

- अ‍ॅड. वर्षा देशपांडे, सातारा

.............