‘निर्भया’तून युवतींनी गिरविले आत्मसंरक्षणाचे धडे

By Admin | Updated: July 29, 2016 23:27 IST2016-07-29T20:51:42+5:302016-07-29T23:27:32+5:30

खटावला प्रशिक्षण : विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पुसेगाव पोलिस ठाण्याचा अनोखा उपक्रम; महाविद्यालयात गु्रप स्थापन

Lessons from self-defense by 'Maidya' from 'Nirbhaya' | ‘निर्भया’तून युवतींनी गिरविले आत्मसंरक्षणाचे धडे

‘निर्भया’तून युवतींनी गिरविले आत्मसंरक्षणाचे धडे

खटाव : मुलींच्या छेडछाडीच्या प्रकारात वाढ झाली आहे. ती रोखण्याकरिता कायद्यातून मदत मिळतेच त्याच बरोबर मुलींनी सुद्धा अशा घटना रोखण्यासाठी साहसाने व धैर्याने सामोरे जाणे गरजेचे आहे. यासाठी गरज आहे ती केवळ योग्य मार्गदर्शनाची. हीच गरज ओळखून पुसेगाव पोलिस ठाण्याच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी वर्धनगड येथे ‘निर्भया प्रशिक्षणा’चे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून शेकडो महाविद्यालयीन युवतींनी निर्भयतेचे धडे गिरविले.
यावेळी मार्गदर्शन करताना पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे म्हणाले, ‘आज समाजात मुली असुरक्षित आहेत असे म्हणत न बसता आपल्यावर होणारा अन्याय तसेच होणाऱ्या त्रासाला आपणच सक्षमपणे प्रतीउत्तर देण्याची वेळ आली आहे. मुलींनी निर्भयपणे व निढरपणाने अशा प्रवत्तींना उत्तर देण्याची आता गरज आहे. आपण अबला नसून सबला आहोत हे दाखवून देण्याची हीच खरी वेळ आहे. अन्याय करणाऱ्या बरोबरच अन्याय सहन करणाराही तीतकाच दोषी असतो. त्यामुळे अन्यायाच्या विरोधात प्रतिकार करण्याची ताकद युवतींमध्ये आहे. तीला जागृत करण्याची वेळ आली आहे. मुलींनी निर्भयपणाने वागावे तसेच पोलिस चौकीत निर्भयपणे आपली कैफीयत मांडण्याकरिता पोलिस अ‍ॅप्स तसेच पोलिस स्टेशनच्या टॅबवर संपर्क साधून आपल्या समस्या निर्भयपणे मांडाव्यात.’ असे आवाहन यावेळी सावंत्रे यांनी केले. खटाव येथील शहाजीराजे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना तसेच महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
याप्रसंगी वर्धनगडचे सरपंच अर्जुनराव मोहिते, प्रा. प्राची पवार, प्रा. शैला घाडगे, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन कुंभार, अविनाश पाचांगणे, हुसेन शिकलगार, शिवाजी कदम, भरत मोहिते, निसार शिकलगार, असलम शिकलगार, संजय जाधव,
वनरक्षक सारिका लवांडे, प्रियांका माने, कॉ. दीपा जाधव यांच्यासह विद्यार्थिनी मोठ्या संख्येने पस्थिती होती. (वार्ताहर)


निर्भया ग्रुपमुळे रोडरोमीओंचा त्रास कमी होणार असून, गुंडगिरीला चाप बसण्यास मदत होईल. पुसेगाव पोलिस ठाण्याच्या माध्यमातून सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या ग्रुपच्या निर्मितीमुळे मुली निर्भयपणे आमच्याशी संवाद साधून व्यथा मांडू लागल्या आहेत.
- राजेंद्र सावंत्रे,
सहायक पोलिस निरीक्षक


युवतींवर होणारे अत्याचार तसेच परिसरात घडणाऱ्या गोष्टींवर ‘निर्भया’ ग्रुपच्या माध्यमातून बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. आमच्या महाविद्यालयाच्या वतीने आम्ही निर्भया ग्रुप तयार केला असून, भयमुक्त वातावरणाकरिता जास्तीत जास्त युवतींनी यामध्ये सामील होणे गरजेचे आहे.
- दीपाली भासले,
विद्यार्थिनी

Web Title: Lessons from self-defense by 'Maidya' from 'Nirbhaya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.