शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
6
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
7
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
8
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
9
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
10
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
11
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
12
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
13
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
14
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
15
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
16
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
17
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
18
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
19
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
20
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...

सातारा जिल्ह्यात पाऊस कमी; धरणात पाण्याची आवक सुरुच, कोयनेतून विसर्ग वाढला

By नितीन काळेल | Updated: July 30, 2024 13:08 IST

उरमोडीतूनही पाणी सोडणार 

सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक टिकून आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊ लागला आहे. परिणामी कोयना धरणातून सुमारे ४२ हजार क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला आहे. तर उरमोडी धरणातूनही पाणी सोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर २४ तासांत महाबळेश्वरला १५८ आणि नवजा येथे १०७ मिलिमीटरची नोंद झाली.जिल्ह्यात मागील आठवड्यात धुवाधार पाऊस झाला. पश्चिमेकडील कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी आदी प्रमुख धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणांमधून विसर्ग सुरू करावा लागला. सध्या पावसाचा जोर कमी झाला असलातरी धरणात आवक कायम आहे.मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १०७ तर नवजाला ९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ३ हजार ५८३, नवजा येथे ४ हजार १५४ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर महाबळेश्वरला आतापर्यंत ३ हजार ९१३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यातच सकाळच्या सुमारास कोयनेत ३५ हजार ४०१ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरण पाणीसाठाही ८५.३७ टीएमसी झाला होता. तर ८१.११ टक्के धरण भरले आहे.त्यातच धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच आहे. यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी दुपारपासून धरणातून विसर्ग वाढविण्यात आला. दरवाजातील विसर्ग ३० हजारावरुन ४० हजारांपर्यंत नेण्यात आला. तर पायथा वीजगृहाची दोन्ही युनीट सुरू असून त्यातून २ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे कोयनेतून ४२ हजार १०० क्यूसेक विसर्ग होत आहे. या विसर्गामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

धोम धरणातूही विसर्ग..वाई तालुक्यातील धोम धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरूच आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास धरणातील पाणीसाठा ८२.५८ टक्के झाला होता. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी आसरे बोगद्यातून कालव्यात १०० तर वीजगृहातून २०० असा एेकूण ३०० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच सायंकाळच्या सुमारासही सांडव्यावरुन विसर्ग करण्याचे नियोजन होते. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

उरमोडीचेही दरवाजे उघडणार..सातारा तालुक्यातील उरमोडी धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरण पातळी नियंत्रित करण्यासाठी वक्र दरवाजे आणि वीजगृहातून विसर्ग करण्यात येणार आहे. यामुळे उरमोडी नदीकाठच्या रहिवाशांना पात्रात प्रवेश करु नये, अशी सूचना करण्यात आलेली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण