शहरं
Join us  
Trending Stories
1
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
3
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
4
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
5
Maharashtta Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
6
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
7
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
8
Panchayat 3 ची झलक बघायची आहे? 'या' दिवशी रिलीज होणार सीरिजचा ट्रेलर
9
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
10
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
11
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद
12
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
13
Success Story: ₹८५० च्या पगारावरून ₹५५,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, नशीब बदलणाऱ्या उद्योजकाची कहाणी
14
पुण्यात पैसे वाटल्याचा धंगेकरांचा आरोप, मुरलीधर मोहोळांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
15
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
16
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
17
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
18
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
19
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
20
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक

Satara: गवत कापणाऱ्या युवकावर बिबट्याचा हल्ला, कऱ्हाड तालुक्यातील घटना

By संजय पाटील | Published: April 05, 2024 12:40 PM

हल्ल्यात युवक जखमी; परिसरात भीतीचे वातावरण 

कऱ्हाड : शेतात वैरणीला गेलेल्या युवकावर बिबट्याने हल्ला केला. धोंडेवाडी, ता. कराड येथील बेंद नावच्या शिवारात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर काले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विजय रामचंद्र पवार (वय ३७) असे जखमी युवकाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, धोंडेवाडी येथील विजय पवार हा युवक गावा नजीकच्या बेंद नावच्या शिवारात वैरण आणण्यासाठी गेला होता. ओढ्याकाठी असलेले घासगवत कापत असताना गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक विजयवर हल्ला चढवला. या घटनेने विजय घाबरला. मात्र, त्याने जीवनाशी बिबट्याला प्रतिकार केला. मोठमोठ्याने आरडाओरडा करीत त्याने बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बिबट्याने त्याच्या खांद्यावर पंजा मारला. तसेच डोक्यालाही गंभीर इजा केली. विजयने जोरदार प्रतिकार केल्यानंतर बिबट्याने तेथून शिवारात धूम ठोकली. घटनेनंतर विजय गावात आला. तेथून त्याला काले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले.घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिक्षेत्र वनाधिकारी तुषार नवले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याठिकाणी भेट दिली. परिसरात बिबट्याचा शोध घेण्यात आला. या घटनेने परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरleopardबिबट्या