शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

सोयीचे मतदारसंघ घेऊन दिग्गज सुरक्षित!

By admin | Updated: February 15, 2017 22:44 IST

राजकीय सारीपाट : फलटण तालुक्यात बारमाही धडाडणाऱ्या तोफा मात्र आमने-सामनेही नाही

नसीर शिकलगार ल्ल फलटणजिल्ह्याच्या राजकारणात फलटण तालुका नेहमीच चर्चेत राहिला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी कायम झडत असतात. परंतु तालुक्यातील सर्वच नेत्यांनी आपल्या सोयीचे मतदारसंघ निवडून तगडा प्रतिस्पर्धी समोर येणार नाही, याचीही काळजी घेऊन स्वत: ‘सेफ झोन’मध्ये गेले आहेत. तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सात गट खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहेत. त्यामध्ये सात गट महिलांसाठी आरक्षित आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही खुल्या प्रवर्गासाठी असल्याने विविध नेते मंडळींच्या राजकीय आशा-आकांक्षाला अनुसरून उमेदवार या निवडणुकीत येईल, अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणे उमेदवारीही आल्या आहेत. तालुक्यात दोन नाईक-निंबाळकर घराण्यातच निवडणुका व्हायच्या आता भाजपाही त्यात आली आहे. जिल्हा परिषदेसाठी कोणत्या तरी एका मतदार संघात दोन नाईक-निंबाळकर घराण्यातील व्यक्ती समोरासमोर येतील, असे वाटत होते. मात्र, जो-तो सोयीप्रमाणे सुरक्षित मतदारसंघ शोधून उभा राहिला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार व रामराजे नाईक-निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक-निंबाळकर राष्ट्रवादीकडून तरडगाव मतदार संघातून उभे आहेत. त्यांच्याविरुद्ध स्वाभिमानी पक्षातर्फे अमोल खराडे उभे आहेत. काँग्रेसने हा मतदारसंघ स्वाभिमानीला सोडून त्यांच्याशी आघाडी केली आहे. शिवसेनेतर्फे आकाश गायकवाड हेही उभे आहेत. येथे चुरशीची लढत होत असून, या मतदार संघातून यापूर्वी संजीवराजे यांच्या पत्नी शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर निवडून आल्या होत्या. साखरवाडी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीतर्फे शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर, काँग्रेसतर्फे रेखा शिंदे यांच्यात लढत होत आहे. मागील निवडणुकीत साखरवाडीतून संजीवराजे नाईक-निंबाळकर राष्ट्रवादीतर्फे निवडून आले होते. हिंगणगाव गटात ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांचे पुत्र धनंजय साळुंखे-पाटील काँग्रेसतर्फे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे धैर्यशील अनपट उभे आहेत. भाजप तर्फे सुरेश निंबाळकर तर शिवसेनेकडून नानासाहेब भोईटे मैदानात आहेत. यंदाच्या निवडणुकीत सर्वांचे लक्ष गिरवी गट व त्यातील दोन्ही गणांकडे लागले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघातून काँग्रेसकडून कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पत्नी अ‍ॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर उभ्या आहेत. त्यांच्या विरोधात माजी आमदार चिमणराव कदम यांचे पुत्र सह्याद्री कदम हे भाजपतर्फे उभे आहेत. सह्याद्री कदम हे या निवडणुकीतून राजकारणात पदार्पण करत आहेत. या दोघांच्या विरोधात राष्ट्रवादीने रामदास कदम यांना उमेदवारी दिल्याने अतिशय चुरशीची तिरंगी लढत होत आहे. या निवडणुकीत जिजामाला नाईक-निंबाळकर व सह्याद्री कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गिरवी गणातून काँग्रेसकडून दिगंबर आगवणे यांच्या पत्नी जयश्री आगवणे उभ्या आहेत. राष्ट्रवादीकडून सीमा गायकवाड तर भाजपकडून अश्विनी अहिवळे यांना उमेदवारी दिली आहे. गिरवी गटातील वाठार निंबाळकर गणातून राष्ट्रवादीने बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांचे पुत्र व रामराजेंचे पुतणे विश्वजीतराजे नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी देत राजघराण्यातील चौथी पिढी राजकारणात आणली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून विष्णू लोखंडे, भाजपने दिलीपराव पवार, रासपने बाबूराव बिचुकले यांना उमेदवारी दिली आहे.