खटाव : ‘कायम दुष्काळी असणाऱ्या खटावला वरदान ठरणाऱ्या तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा जिहे-कठापूरचे पाणी नेर तलावात पंधरा दिवसांत पडणार आणि ही सर्वांच्या दृष्टीने वरदायी असणारी योजना लवकरच कार्यान्वित होणार असून, हा सोनियाचा दिवस जवळ आल्याचा मनस्वी आनंद होत आहे,’ असे प्रतिपादन गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार ट्रस्टचे कार्याध्यक्ष सुहास जोशी यांनी केले.
खटावमध्ये पंतप्रधान मोदी यांचे गुरू लक्ष्मणराव इनामदार यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, राहुल पाटील, सरपंच अभय घाडगे, रणधीर जाधव, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जोशी म्हणाले, ‘खटावच्या शेती पाण्याचा प्रश्न लवकर मिटावा आणि या भागातील शेतकरी सुजलाम्-सुफलाम् व्हावा, या दृष्टीने कोरेगाव-खटावचे आमदार महेश शिंदे यांचे सहकार्य महत्त्वाचे असून, त्यांच्या प्रयत्नातून ही योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे. सर्व बाबींची पूर्तता व सर्व कामे अंतिम टप्प्यात आली असून, आता प्रतीक्षा फक्त १५ दिवसांची उरली आहे. हे काम गेल्या कित्येक वर्षांपासून विविध कारणाने रखडले होते. त्यास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून केंद्रीय जलआयोगाची परवानगी मिळवून हे काम तडीस नेण्यासाठी ट्रस्टच्या सदस्यांचे देखील योगदान तितकेच महत्त्वाचे आहे.’
यावेळी कार्यक्रमास ट्रस्टचे सदस्य चरण बोबडे, संजय टकले, उमेश भिसे, बाळ इनामदार,
अभिजित देशमुख, विशाल देशमुख, शेखर देशमुख, ताईमूर मुल्ला, रोहन देशमुख, विशाल भोसले, अमोल फडणीस, सुदीप देशमुख, राहुल जमदाडे, आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
२३खटाव
कॅप्शन : गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करताना सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, कार्याध्यक्ष सुहास जोशी, राहुल पाटील व मान्यवर उपस्थित होते.