रामापूर : स्पर्धेच्या युगात सर्वांचा वेळ महत्त्वाचा असतो. नवनवीन तंत्रज्ञानचा वापर करून घरबसल्या वीज, मोबाईल, टीव्ही रिचार्ज मारले जातात. त्यामुळे लोकांचा वेळेची बचत होते. त्याच तंत्रज्ञानचा वापर करून नगरपंचायत मिळकत करदेखील आता भरता येणार आहे. या आधुनिक तंत्रज्ञानचा वापर करून पाटणमधील नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयाकडे थकीत मालमत्ता कर वेळेत जमा करावे, असे आवाहन नगराध्यक्ष अजय कवडे यांनी केले.
पाटण नगरपंचायतीमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक नितीन चौखंडे यांच्या हस्ते व बांधकाम सभापती किरण पवार मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांच्या उपस्थितीत स्वाईप मशीन या डिजिटल सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते
नगराध्यक्ष अजय कवडे म्हणाले, ‘नागरिकांनी लाभ घेऊन ऑनलाईन पद्धतीने अथवा रोखीने नगरपंचायत कार्यालयाकडे थकीत मालमत्ता कर वेळेत जमा करावा. जेणेकरून पाटण शहराच्या विकासकामांना गती देता येईल.
कार्यक्रमास नगरपंचायतीच्या करनिर्धारण अधिकारी मृदुला काटवटे, वैष्णवी पुजारी, वसुली अधिकारी सूर्यकांत चव्हाण, विष्णू चव्हाण, रघुनाथ चंद्रकांत मोरे, सुनील चौधरी उपस्थित होते.