शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचे वीरपुत्र सुभेदार विजय शिंदे पंचत्वात विलीन; लष्कराकडून मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 20:29 IST

विजय शिंदे यांचे वडील सर्जेराव शिंदे हेही लष्करात २२ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये सुभेदार पदावरून निवृत्त झाले होते. तीन-चार वर्षांपूर्वीच त्यांचे निधन झाले. वडील, मोठा भाऊ प्रमोद यांचा देशसेवेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशसेवेत जायचंच, हे स्वप्न उराशी बाळगून विजय शिंदे यांनीही शिक्षणाचे धडे घेतले.

पुसेगाव : लेह-लडाखमध्ये देशसेवा बजावताना अपघाती निधन झालेले महाराष्ट्राचे वीरपुत्र सुभेदार विजय सर्जेराव शिंदे (वय ४०) यांच्यावर रविवारी खटाव तालुक्यातील विसापूर येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘विजय शिंदे अमर रहे. ’च्या घोषणा देत हजारो नागरिकांनी विसापूरच्या या भूमिपुत्राला अखेरचा सलाम केला.

विजय शिंदे यांचे वडील सर्जेराव शिंदे हेही लष्करात २२ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये सुभेदार पदावरून निवृत्त झाले होते. तीन-चार वर्षांपूर्वीच त्यांचे निधन झाले. वडील, मोठा भाऊ प्रमोद यांचा देशसेवेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशसेवेत जायचंच, हे स्वप्न उराशी बाळगून विजय शिंदे यांनीही शिक्षणाचे धडे घेतले. विजय शिंदे हे वयाच्या १७ व्या वर्षी २२ मराठा लाईट इन्फंट्रीत लष्करी सेवेत रुजू झाले. ते सध्या लेह-लडाख येथे सुभेदार पदावर कार्यरत होते. २६ जवान परतापूरच्या संक्रमण शिबिरातून उपसेक्टर हनिफच्या फॉरवर्डकडे जात असताना लष्कराचे वाहन रस्त्यावरून घसरून श्योक नदीत पडले. या अपघातात सात सैनिकांना वीरमरण आले. त्यात सुभेदार विजय शिंदे यांचाही समावेश होता.

विजय शिंदे यांचे पार्थिव रविवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या मूळगावी विसापूर येथे कुटुंबीय व नातेवाईकांना अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. त्यांचे पार्थिव दिसताक्षणी वीरपत्नी प्रिया, मुली दिया, रिया, वीरमाता अरुणा शिंदे, भाऊ प्रमोद व हणमंत शिंदे यांच्यासह कुटुंबियांनी आक्रोश केला. हा क्षण उपस्थितांचे हृदय पिळवटणारा होता. मुख्य रस्त्याच्या स्वागत कमानीपासून फुलांनी सजवलेल्या रथातून सुभेदार विजय शिंदे यांच्या अंत्ययात्रेला प्रारंभ झाला. रथापुढे देशभक्तीपर गीते लावली होती. गावातील मुलींनी अंत्ययात्रा मार्गावर फुले टाकली होती.

अंत्ययात्रा मार्ग व चौकाचौकात ‘वीर जवान तुझे सलाम, विजय शिंदे अमर रहे...’ असे फलक लावले होते. या दरम्यान विजय शिंदे यांचे पार्थिव श्री वाघेश्वरी मंदिरालगतच्या चौकात स्टेजवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर कुंभारकी शिवारात होणाऱ्या अंत्यविधीच्या ठिकाणी रथातून पार्थिव नेण्यात आले.

यावेळी आमदार महेश शिंदे, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, माजी पोलीस महानिरीक्षक भुजंगराव शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, तहसीलदार किरण जमदाडे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन बाळासाहेब जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, मानजीराव घाडगे, बंडा गोडसे, संदीप मांडवे यांच्यासह सैन्य दलातील अधिकारी, जवानांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.

जिल्ह्याने एक वीर गमावला : पालकमंत्रीलेह लडाख येथे भारतमातेचे संरक्षण करीत असताना विसापूरचे सुपुत्र सुभेदार विजय शिंदे हे शहीद झाले. त्यांच्या निधनाने भारत मातेने एक वीर सुपुत्र गमावला आहे. शिंदे कुटुंबासोबतच संपूर्ण जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहीद सुभेदार विजय शिंदे यांच्या दुःखात संपूर्ण सातारा जिल्हा सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो, अशी भावपूर्ण श्रद्धांजली पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी वाहिली.

देशाप्रती असणारे शहीद विजय शिंदे यांचे कार्य अमर राहील -सातारा जिल्हा शूरवीरांचा व क्रांतिकारकांचा म्हणून ओळखला जातो. देशसेवेची परंपरा जोपासण्याचे काम विसापूर गावातील अनेक युवक करीत आहेत. लेह लडाख येथे सुभेदार विजय शिंदे हे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. देशाप्रती असणारे शहीद विजय शिंदे यांचे कार्य अमर राहील.- खासदार श्रीनिवास पाटील 

टॅग्स :SoldierसैनिकSatara areaसातारा परिसरMartyrशहीदIndian Armyभारतीय जवान