शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशी नागरिकांचे मोठ्या संख्येने महाबळेश्वरात बेकायदा वास्तव्य : किरिट सोमय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 17:38 IST

कोम्बिंग ऑपरेशनची मागणी

सातारा : जिल्ह्यात व महाबळेश्वरात बांगलादेशी नागरिक मोठ्या संख्येने बेकायदा वास्तव्य करत आहेत. महाबळेश्वरात सुरू असलेल्या बांधकामांवर हे नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत. बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवावे, अशी मागणी किरिट सोमय्या यांनी केली.भाजपचे नेते, माजी खासदार किरिट सोमय्या यांनी शुक्रवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बेकायदा बांगलादेशी नागरिकांच्या वास्तव्याबाबत चर्चा केली व शोधमोहीम राबवण्याची मागणी केली.किरिट सोमय्या म्हणाले, ‘बोगस जन्मदाखले मिळवून अनेक बांगलादेशींचे राज्यात, तसेच सातारा जिल्ह्यात वास्तव्य आहे. त्यांचा तातडीने शोध घेणे गरजेचे असून, कोम्बिंग ऑपरेशन राबवावे. राज्यातील बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांना बोगस जन्म दाखले, आधार कार्ड उपलब्ध होतात. यामागे मोठी यंत्रणा कार्यान्वित आहे. त्याचाही तातडीने शोध घ्यावा.महाबळेश्वर येथील वनसंरक्षित क्षेत्रात नियमांचे उल्लंघन करून अनेक रिसॉर्ट आणि बंगले उभे राहिलेले आहेत. मी लवकरच महाबळेश्वरला जाणार असून, अवैध बंगल्यांचे सर्वेक्षण करणार आहे. त्याची माहिती झाल्यानंतर मी पुन्हा माध्यमांशी बोलेन. सध्या काँग्रेस, उद्धवसेना, एमआयएम, समाजवादी, शरद पवार यांची राष्ट्रवादी आदी पक्षांकडून अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण सुरू असून, बांगलादेशींना वाचवण्याची स्पर्धा सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

अवैध बांधकाम कोणाचेही असो, कारवाई होणारमहाबळेश्वरमधील संबंधित २३ मालमत्तांची यादी ऐन निवडणुकीवेळी का द्यावी वाटली, त्याठिकाणच्या बंगल्यांवर अनेक राजकीय नेते येत असल्याचा प्रश्न माध्यमांनी उपस्थित केला. यावर सोमय्या म्हणाले, ‘मी वर्षभर याचा पाठपुरावा करत आहे. पूर्ण अभ्यास झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाला मी माहिती दिली. त्यानुसार तपासणी सुरू आहे. ज्या कुणाचे अवैध बांधकाम सुरू आहे, त्यावर कारवाई होणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

पार्थ पवार यांच्याविषयीच्या प्रश्नाला बगलउपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या जमीन गैरव्यवहाराविषयीच्या प्रश्नाला सोमय्यांनी बगल दिली. ते म्हणाले, या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वत:च लक्ष घातले आहे. शासनाचे धोरण स्पष्ट आहे. कोणीही जमीन घोटाळा केला असला तरी सरकार कोणाला सोडणार नाही.’