शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

बीजगुणन केंद्राची जमीन पडीक -: निधीचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 22:16 IST

याठिकाणी शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने भात, सोयाबीन, ऊस आदी पिकांपासून बियाण्यांची निर्मिती केली जाते.

ठळक मुद्देकाळोलीत चौदा हेक्टरमध्ये झुडपे, वेलींचे साम्राज्य; पाणीही साचले

नीलेश साळुंखे ।कोयनानगर : काळोली, ता. पाटण येथे गुहाघर-विजापूर महामार्गाच्या दुतर्फा कृषी चिकित्सालय कार्यालय व बीजगुुणन केंद्र आहे. याठिकाणी शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने भात, सोयाबीन, ऊस आदी पिकांपासून बियाण्यांची निर्मिती केली जाते. सध्या या बीजगुणन केंद्रातील सुमारे चौदा हेक्टर शेत जमिनीची पड झाली असून, झाडेझुडपे व गवताने ही जमीन व्यापली आहे. शासकीय निधी उपलब्ध नसल्याने या जमिनीत पिके घेतली जात नाहीत.

काळोलीतील कृषी केंद्राकडे सुमारे चौदा हेक्टर जमीन असून, कार्यालयीन जागा व रस्त्याची जागा सोडून सर्व ठिकाणी बीजनिर्मिती करण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये भात, सोयाबीन, ऊस आदी पिके घेतली जातात. यावर्षी खरीप हंगामातील पेरण्या उरकत आल्या तरी बीजगुणन केंद्रात कोणतीही हालचाल दिसत नाही. शेतात वाढलेले गवत, साचलेली पाण्याची तळी पाहून शेतांची पेरणीपूर्व मशागत केली नसल्याचे दिसते. याबाबत अधिक माहिती घेतली असता राज्यातील विविध ठिकाणची शेती खर्चाची देयके बाकी असल्याच्या कारणाने चालू वर्षी बीजगुणन केंद्रात खरीप हंगामातील पिके घेतली जाणार नसल्याची माहिती समोर आली. यामुळे विविध ठिकाणची शेकडो एकर शेती पडून राहणार आहे.

काळोली येथे राज्य शासनाच्या कृषी विभागाचे तालुक्याचे मुख्य कार्यालय असल्याने याठिकाणी विविध प्रशिक्षण शिबिरे, शेती उपकरण, अवजार यासह शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जाते. यामुळे येथे नेहमीच शेतकऱ्यांचा राबता असतो. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानासह प्रयोगशील शेतीचे धडे देणाºया कृषी पंढरीतील शेतीची पड पाहून अंचबित वाटत आहे. बीजगुणन केंद्राची बारमाही वाहणाºया कोयना नदीवरील पाण्याची योजना सुपीक काळी जमीन कृषी पदवी घेतलेले कर्मचारी असूनही जमीन पडून राहत आहे. चालूवर्षी शेती पडून राहिल्यास त्यातून बियाणापोटी मिळणारे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडणार आहे. तर आता पडीक जमिनीमुळे पाळीव जनावरे मोकाटपणे चरण्यासाठी फिरत आहेत. काही ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. तर पीक नसल्याने आणि बांधांवर मातीची भर नसल्याने ते फुटण्याची शक्यता आहे.

गवत व वेली, काटेरी झाडेझुडपे वाढत असल्याने पुन्हा ही शेती पीक घेण्यायोग्य करण्यासाठी शेती खर्चाच्या तिप्पट खर्च येणार आहे. जसजसे दिवस जातील, तसा हा खर्च वाढतच जाणार असून याबाबत ठोस कार्यवाही होणे गरजेचे आहे. वरिष्ठ पातळीवर सकारात्मक दृष्टीने पाहून या भूमातेतून बीजरुपी सोनं पिकवावे, अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करत आहे.

 

आॅगस्ट महिन्यात पाडेगाव संशोधन केंद्राकडून ऊस बियाणे घेऊन वर्षभर होणारा खर्च उधारीवर करण्यात येणार आहे. बियाणे विक्री झाल्यानंतर खर्चाची रक्कम अदा करण्यात येणार आहे. मात्र, पावसाने उघडीप दिली तरच मेहनतीचे काम होणार आहे. तसेच महाबीजने भाताचे तरू उपलब्ध केले तर भात लागण करून पिकवलेले धान्य महाबीजला विक्री करायचे, या अटीवर भाताची लागण होणार आहे.- एस. बी. बोराटेकृषी सहायक, कºहाड

काळोली, ता. पाटण येथे असलेली बीजगुणन केंद्राची जमीन पडीक असून, त्याठिकाणी सध्या झुडपे, वेली वाढल्या आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी