ट्रकमधून लाखाचे साबण लंपास
By Admin | Updated: December 21, 2014 00:37 IST2014-12-21T00:32:33+5:302014-12-21T00:37:15+5:30
ट्रकमधून लाखाचे साबण लंपास

ट्रकमधून लाखाचे साबण लंपास
मल्हारपेठ : निसरे फाटा येथील पेट्रोलपंपावर विश्रांतीसाठी उभ्या असलेल्या मालवाहतूक ट्रकमधून चोरट्यांनी सुमारे एक लाखाच्या साबणाच्या गोण्या लंपास केल्या. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.
मल्हारपेठ पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण तालुक्यातील लोटे येथून साबणाच्या ५२६ गोण्यांनी भरलेला ट्रक (सीजी ०४ जी ९१५०) पाटणमार्गे रायपूरला निघाला होता. हा ट्रक शुक्रवारी मध्यरात्री एक ते साडेतीनच्या सुमारास पाटण-कऱ्हाड रस्त्यालगत निसरे फाटा येथील पेट्रोलपंपावर विश्रांतीसाठी उभा केला होता. त्यानंतर चोरट्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकमधून साबणाच्या ३७ गोण्या काढून दुसऱ्या मालवाहतूक ट्रकमधून पळविल्या. ही घटना समजताच जागे झालेला ट्रकचालक छत्रभूज बापूराव ठाकरे (वय ५३, रा. कारंजालाढ, जि. वाशिम) यांनी पाहणी करून चोरीला गेलेल्या मालाचा शोध घेऊ लागले. त्यानंतर शनिवारी सकाळी मल्हारपेठ पोलीस दूरक्षेत्रात खबर दिली. सहायक पोलीस निरीक्षक हणमंत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. यामध्ये एक लाखाचा ऐवज चोरीला गेल्याचे समोर आले आहे. पोलीस हवालदार प्रवीण काटवटे तपास करीत आहेत. (वार्ताहर)