शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मसूर येथे सशस्त्र दरोडा टाकून ५ लाखाचा ऐवज लंपास, डॉक्टर दांपत्यास केली बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 14:00 IST

घटनास्थळी श्वानपथक पाचारण करण्यात आले होते. तर, तपासासाठी चार वेगवेगळ्या ठिकाणी पथके रवाना करण्यात आली.

मसूर : येथील संतोषीमाता नगर येथे राहणारे सेवानिवृत्त पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या घराच्या मुख्य दरवाजाची कडी उचकटून अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी डॉक्टर दांपत्यास बेदम मारहाण करत वारे यांच्या घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली.दरोडेखोरांच्या हल्ल्यात डॉ. संपत इराप्पा वारे व अनिता संपत वारे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या घटनेने मसूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान घटनास्थळी श्वानपथक पाचारण करण्यात आले होते.याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यरात्री पावणे तीन वाजण्याच्या सुमारास चार ते पाच दरोडेखोरांनी डॉ. वारे व पत्नी अनिता वारे यांना दांडक्याने मारहाण केली व गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यानंतर हॉल मध्ये झोपलेल्या पुष्पा जगदाळे यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व नऊ हजार रुपये रोकड काढून घेतली. डॉक्टर वारे यांची सून पूजा हिने गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण व कानातील टॉप्स त्यांना काढून दिले. दरोडेखोरांनी डॉ. वारे यांच्या घराबाहेर लावलेल्या चारचाकी गाडीची काच फोडून दमदाटी करून दरोडेखोर निघून गेले.घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बंसल, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख अजित बोराडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रणजीत पाटील यांनी भेट देऊन परिस्थितीची पहाणी करुन तपासाबाबत योग्य त्या सूचना दिल्या. चोरीच्या तपासासाठी चार वेगवेगळ्या ठिकाणी पथके रवाना करण्यात आली.

घरांमध्ये लाखो रुपयांचा ऐवज ठेवला असताना त्याच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. लाखो रुपये खर्चून मोठमोठे बंगले बांधले आहेत. परंतु सीसीटीव्ही बसवलेले नाहीत. घराच्या सुरक्षेसाठी काळाच्या गरजेनुसार सीसीटीव्ही सेफ्टी डोअर, लाईट इत्यादी गोष्टी आवश्यक आहेत. - अजय गोरड, सहाय्यक पोलीस निरीक्षक,उंब्रज

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस