दामदुप्पट पैशांच्या आमिषाने लाखोंची फसवणूक

By Admin | Updated: July 31, 2014 23:20 IST2014-07-31T22:28:03+5:302014-07-31T23:20:28+5:30

गुन्हा दाखल झाला.

Lack of millions of fraud on bribe money | दामदुप्पट पैशांच्या आमिषाने लाखोंची फसवणूक

दामदुप्पट पैशांच्या आमिषाने लाखोंची फसवणूक


सातारा : पैसे दामदुप्पट देण्याच्या आमिषाने साताऱ्यातील काहीजणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघाविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
आत्माराम अंतू काळे (रा. अनावळे, पो. यवतेश्वर), शशिकांत गंगाराम संकपाळ (रा. कुरुळ), उत्तम कुंडलीक तेली (रा. गोरेगाव,) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजवाडा येथे ‘इलेगंट आॅनलाईन मार्केटींग कंपनी’चे कार्यालय आहे. सुरुवातीला या गुंतवणूक केल्यानंतर कंपनीद्वारे ४२०० रुपयांचा चेक दिला जात होता. अशाप्रकारे दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवले जात होते. मोठ्या रकमेची गुंतवणूक झाल्यानंतर कंपनीकडून केवळ एकच चेक काहींना मिळाला. मात्र, उर्वरीत चेक मिळाले नाहीत. त्याबाबत नागरिकांनी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर संबंधित लोकांंना कंपनीकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. राजवाडा येथील कार्यालयात चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता संबंधित कंपनी गाशा गुंडाळून पसार झाली असल्याचे निदर्शनास आले. बाचल यांची १ लाख २५ हजारांंची ङ्खफसवणूक झाली आहे. दरम्यान, साताऱ्यातील अनेक गुंतवणूकदारांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याने खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Lack of millions of fraud on bribe money