चिमुकले बनणार कृष्णाकाठचे स्वच्छतादूत!
By Admin | Updated: July 7, 2015 20:56 IST2015-07-07T20:56:09+5:302015-07-07T20:56:09+5:30
आराखडा तयार : वाई नगरपालिकेचा ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत प्लास्टिक कचरामुक्तीचा महत्त्वाकांक्षी संकल्प -गूड न्यूज

चिमुकले बनणार कृष्णाकाठचे स्वच्छतादूत!
वाई : नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी आशा राऊत यांनी ‘‘स्वच्छ भारत मिशन आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान’’ या अभियाना अंतर्गत स्वच्छतेमध्ये सर्वांचा सहभाग घेण्यासाठी वाई नगरपरिषद हद्दीतील सर्व शैक्षणिक संस्था, बचत गट, हॉटेल, लॉज व मंगल कार्यालय, बँका व पतसंस्था, निरनिराळया सामाजिक संस्था, उद्योजकांच्या वेगवेगळया बैठका नगरपरिषदेच्या यात्री निवासमधील सभागृहात घेतल्या. यामध्ये वाई शहर स्वच्छ करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे.शिक्षक हा समाजातील अविभाज्य घटक असल्याने स्वच्छतेच्या मोहीमेत शिक्षण संस्थेचा सहभाग आवश्यकच आहे़, असा विचार पुढे आले. पालिका गोळा करत असलेल्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक येऊ नये, याकरिता प्रत्येक घरोघरी प्लास्टिक संकलनासाठी विद्यार्थ्यांना प्लास्टिक पिशव्या संकलनासाठी बक्षीसपर योजना सुरू करणार आहे़ प्रत्येक विद्यार्थ्यास एक कार्ड देण्यात येणार असून त्यामध्ये शंभर शिक्के राहणार आहेत़ प्रत्येक विद्यार्थ्याने एक किलो प्लास्टिक पिशवीभर कचरा गोळा करून आणल्यावर त्यास एक शिक्का त्या कार्डवर मारुन देण्यात येणार आहे़ अशा प्रकारे शंभर किलो प्लास्टिक पिशवी गोळा केल्यानंतर विद्यार्थ्यास शालोपयोगी साहित्य बक्षीस दिले जाणार आहे.यामुळे विद्यार्थ्यामध्ये आपल्या घरातील प्लास्टिक पिशवी गोळा करण्यामध्ये जास्तीत जास्त कल राहील व त्यामुळे कचऱ्यामध्ये प्लास्टिक पिशवी येणार नाही़ अशा प्रकारे संकलित केलेल्या प्लास्टिक पिशव्यांचे गठ्ठे करुन त्या सिमेंट अथवा अन्य फॅक्टरीसाठी नगरपरिषद देणार आहे़ त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या पालकांकडून घरातील कचऱ्याचे नगरपरिषदेमार्फत यथोचित बक्षिस देऊन सत्कार करण्यात येणार आहे़. त्यामुळे विद्यार्थ्यांस आपल्या आई-वडिलांच्या कामकाजाचे मुल्यमापन करण्याची संधी प्राप्त होणार आहे़
नगरपरिषद हद्दीमधील सर्व शाळांमधील प्रत्येक वर्गामध्ये एक मुलगा, एक मुलगी यांची स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती करणेत येणार आहे़ तसेच शाळेसाठी एक शिक्षक स्वच्छता दूत म्हणून काम करेल़ हे सर्व स्वच्छता दूत घर, शाळा परीसरात दररोज निर्माण होणारा कचरा हा वेगवेगळया प्रकारे वर्गीकरण करुन संकलीत केला जातो का? याबाबत दक्षता घेतील, अशा प्रकारे विद्यार्थ्यांकडून गोळा होणारे प्लॉस्टिक हे एका मोठ्या कंटेनरमध्ये साठवण्यात येईल व अशा प्रकारे कंटेनर भरला कि ते प्लॉस्टिक नगरपरिषद घेऊन जाईल़
प्रत्येक शाळेने शाळा आणि शाळेचा परिसराची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे़ विशेषत: शाळेतील स्वच्छतागृहाचा वापर विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे करणे आवश्यक आहे.़ विदयार्थ्यांनी शाळा परीसर आणि रस्त्यावर स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करणेची गरज आहे़ शाळेतील विद्यार्थ्यांनी कुटुंबातील सदस्यांना घरात निर्माण होणारा कचरा हा वेगवेगळा ठेवणेबाबत सुचित करणेचे आहे़
ज्या प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा चांगला उपक्रम राबवितील अशा नगरपरीषद शाळा, खाजगी शाळा आणि माध्यमिक शाळा यांना नगरपरीषदेमार्फत बक्षिस देण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)
कचरा संकलनासाठी बादल्या
वाई नगरपालिका हद्दीत ९,५४२ कुटुंबे असून त्यांना नगरपालिका सेवाभावी संस्था, बँका, पतसंस्था, कंपन्या व दानशूर उद्योजकांच्या मदतीतून ओला व सुका ठेवण्यासाठी दोन बादल्या दिल्या जाणार आहेत. त्यामुळे कचऱ्याचे व्यवस्थापन करता येईल़
सेवाभावी संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये, बँका, शासकीय कार्यालये, महिला बचत गट, हॉटेल व्यवसायिक व नागरीकांना या अभियानात सहभागी करून शहर प्लास्टीक कचरा मुक्त करून स्वच्छ शहर सुंदर शहर साकारले जाईल़.
- आशा राऊत,
मुख्याधिकारी,
वाई नगरपालिका
वृक्ष दत्तक योजना
वाई नगरपरिषद हद्दीमधील प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष दत्तक योजना राबवून प्रत्येक विद्यार्थ्यामागे एक वृक्ष लागवड हा उपक्रम चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा आहे़ याकरिता प्रत्येक शाळेस आवश्यक असणारी वृक्षाची रोपे पालिका पुरविणार आहे़ त्यामुळे पालिका हद्दीमधील पर्यावरणाचा समतोल राखला जाऊन वाई शहर हरित होणार आहे़ यामध्ये सेवाभावी संस्थांना सहभागी करून घेतले जाईल. प्रत्येक सामाजिक संस्थांचा सहभाग घेतला जाणार आहे.
१३५ स्वच्छतागृहांकडे स्वच्छतागृहांचा अभाव
२०११ च्या जनगणनेप्रमाणे शासनाकडील सर्वेक्षणानुसार वाई शहरात १३५ कुटुंबाकडे शौचालय व्यवस्था नाही़ याकरिता केंद्र शासनाचे योजनेप्रमाणे शौचालयाचे बांधकामाकरिता प्रत्येक कुटुंबास अनुदान देण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाबरोबरच पालिका स्वत:चे निधीतून दहा हजारांचे अनुदान देणार आहे़ यासाठी प्रथम अर्ज देवून शौचालय बांधकामासाठी परवानगीची मागणी करेल त्याचा प्रथम विचार केला जाणार आहे़
गट स्वच्छतागृहांना परवाने
शौचालय बांधकामासाठी फक्त स्वत:ची जागा असणे आवश्यक आहे़ मात्र, दोन किंवा अधिक कटुंबास आर्थिक परिस्थिती अभावी अथवा जागे अभावी वैयक्तीक शौचालयाचे बांधकाम करणे शक्य नसल्यास अशा कटुंबासाठी एकत्रीत गटशौचालय बांधणेचे झालेस तशी परवानगी दिली जाणार आहे़ त्यासाठी नगरपरीषद अनुदान देणार आहे़