कृष्णा बँकेला १२ कोटी ६५ लाख रुपयांचा नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:38 IST2021-04-06T04:38:36+5:302021-04-06T04:38:36+5:30

कराड : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची हक्काची बँक समजल्या जाणाऱ्या कृष्णा सहकारी बँकेला ३१ मार्च २०२१ अखेर आर्थिक ...

Krishna Bank makes a profit of Rs 12 crore 65 lakh | कृष्णा बँकेला १२ कोटी ६५ लाख रुपयांचा नफा

कृष्णा बँकेला १२ कोटी ६५ लाख रुपयांचा नफा

कराड : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची हक्काची बँक समजल्या जाणाऱ्या कृष्णा सहकारी बँकेला ३१ मार्च २०२१ अखेर आर्थिक वर्षात १२ कोटी ६५ लाख रुपये इतका ढोबळ नफा झाला आहे. बँकेने या आर्थिक वर्षात ६५० कोटी रुपयांचा व्यवसाय टप्पा पूर्ण केला असून, बँकेने पुढील वर्षाअखेर १००० कोटी रुपयांचे व्यवसाय उद्दिष्ट निश्चित केले असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली आहे.

प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की ,सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी यांना केंद्रबिंदू मानून लोकांना बचतीची सवय लागावी व गरजेनुसार कर्ज घेता यावे यासाठी दिवंगत जयवंतराव भोसले यांनी कृष्णा सहकारी बँकेची स्थापना केली. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कृष्णा बँकेच्या ३१ मार्च २०२१ अखेरच्या एकूण ठेवी ४३५ कोटी ७६ लाख रुपयांच्या आहेत. २१४ कोटी ९८ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. बँकेचा एकूण व्यवसाय ६५० कोटींच्या वर झाला असून, निव्वळ एन.पी.ए. शून्य टक्के राखण्यात बँक यशस्वी झाली आहे. सर्व तरतुदी व कर वजाजाता बँकेने ५ कोटी ४ लाख एवढा निव्वळ नफा कमाविला आहे.

कोराना साथीच्या काळातही बँकेने सर्व संचालक मंडळ, सभासद, खातेदार व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने चांगली कामगिरी करत, व्यवसायवृद्धीचे उद्दिष्ट गाठण्यात यश मिळविले आहे. बँकेने ग्राहकांच्या सेवेसाठी एटीएम सुविधा, एस.एम.एस. बँकिंग, ई-कॉमर्स, आर.टी.जी.एस./एन.ई.एफ.टी., एन.ए.सी.एच्., लॉकर्स यासारख्या अत्याधुनिक सुविधा सुरू केल्या आहेत तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे या ४ जिल्ह्यांत १९ शाखांच्या माध्यमातून विनम्र व तत्पर सेवा देणाऱ्या या बँकेने सुरू केलेल्या एटीएम सेवेचा लाभही ग्राहकांना होत आहे. बँकेच्या विविध ठेव व कर्ज योजनांचा तसेच अन्य सुविधांचा लाभ लोकांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. अतुल भोसले यांनी केले आहे.(वा.प्र)

फोटो : डॉ. अतुल भोसले

Web Title: Krishna Bank makes a profit of Rs 12 crore 65 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.