कोयनेचे दरवाजे पुन्हा उघडले, नदीपात्रात विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 12:32 PM2020-08-21T12:32:15+5:302020-08-21T12:33:44+5:30

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढू लागला असून शुक्रवारी सकाळपर्यंत कोयना येथे ७३, महाबळेश्वरला १०५ आणि नवजाला १३८ मिलिमीटरची नोंद झाली. यामुळे कोयना धरणात आवक वाढली असून पुन्हा दरवाजे दीड फुटापर्यंत उघडण्यात आले आहेत. त्यातून ९८५७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. तर धरणात ९४ टीएमसी साठा झाला होता.

Koyne's doors reopened, immersed in the river basin | कोयनेचे दरवाजे पुन्हा उघडले, नदीपात्रात विसर्ग

कोयनेचे दरवाजे पुन्हा उघडले, नदीपात्रात विसर्ग

Next
ठळक मुद्दे कोयनेचे दरवाजे पुन्हा उघडले, नदीपात्रात विसर्ग पाऊस वाढला; नवजाला १३८ मिलिमीटरची नोंद

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढू लागला असून शुक्रवारी सकाळपर्यंत कोयना येथे ७३, महाबळेश्वरला १०५ आणि नवजाला १३८ मिलिमीटरची नोंद झाली. यामुळे कोयना धरणात आवक वाढली असून पुन्हा दरवाजे दीड फुटापर्यंत उघडण्यात आले आहेत. त्यातून ९८५७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. तर धरणात ९४ टीएमसी साठा झाला होता.

जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात २० दिवसांपूर्वी पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वर परिसरात जोरदार पाऊस झाला. यामुळे कोयना, कृष्णा, नीरा, उरमोडी, वेण्णा नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली. तर कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी आणि तारळी सारख्या प्रमुख धरणांतील साठाही वेगाने वाढू लागला. त्यातच कोयना धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्यामुळे शनिवारपासूनच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. तर इतर धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होता.

परिणामी नद्यांना पूर आला. मात्र, पाच दिवसांपूर्वी पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे धरणातही पाणी कमी येत असल्यामुळे विसर्ग कमी करण्यात आला. कोयनेचे दरवाजे १० फुटांपर्यंत उघडण्यात आले होते. तेही बंद करण्यात आले. फक्त पायथा वीजगृहातून विसर्ग सुरू होता. मात्र, गुरुवारपासून पावसाचा जोर वाढू लागला. त्यामुळे कोयना धरणातही आवक वाढली.

परिणामी शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास धरणात ९४ टीएमसीवर पाणीसाठा झाला होता. तर आवक वाढल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सकाळपासून धरणाचे दरवाजे दीड फुटापर्यंत वर उचलण्यात आले. त्यातून ९८५७ आणि पायथा वीजगृह २१०० असा ११९५७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.

शुक्रवारी सकाळपर्यंत कोयनानगर येथे ७३ तर जूनपासून आतापर्यंत ३७८४ मिलिमीटर पाऊस झाला. तर महाबळेश्वरला १०५ आणि आतापर्यंत ४२३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर नवजाला सकाळपर्यंत १३८ आणि आतापर्यंत ४२४९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर सकाळी ११ च्या सुमारास कोयना धरणात ३६६५९ क्यूसेक वेगाने पाणी येत होते.

दरम्यान, सातारा शहरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू आहे. त्यातच दुपारच्या सुमारास ऊनही पडते. तर शुक्रवारी सकाळी रिमझिम पावसाला सुरूवात झाली. मात्र, त्यानंतर ऊन पडले होते.


जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी...

जिल्ह्यात पाऊस सुरूच असून शुक्रवारी सकाळी कोयना धरणात ८८.६४ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला होता. तर याची टक्केवारी ८८.५३ होती. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणांतील उपयुक्त पाणीपातळी टीएमसीमध्ये व टक्केवारी कंसात अशी आहे. धोम - १०.९२ (९३.४१), धोम बलकवडी - ३.५९ (९०.५८), कण्हेर - ८.५४ (८९.०७), उरमोडी - ९.१४ (९४.७०), तारळी - ५.४२ (९२.७९), निरा देवघर - १०.६८ (९१.०७), भाटघर - २३.५० (९९.९९) आणि वीर धरण - ९.४१ (१००.०३).

 

Web Title: Koyne's doors reopened, immersed in the river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.