शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
9
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
10
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
11
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
12
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
13
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
14
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
15
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
16
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
17
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
18
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
19
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
20
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?

कोल्हापूर ते मुंबई प्रवास करणाऱ्यांना विविध अडचणी-- लोहमार्गावर तांत्रिक बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 19:13 IST

मुंबईहून सकाळी सुटणारी कोयना एक्स्प्रेस बंद करण्यात आल्याने मुंबईहून कोल्हापूरकडे येणा-या प्रवाशांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. कोयना एक्स्प्रेस ही कोल्हापूरकडे जाणारी महत्त्वाची व दिवसा जाणारी एकमेव गाडी असल्याने प्रवाशांची या गाडीला प्रथम पसंती असते. मात्र,

ठळक मुद्दे कोयना एक्स्प्रेस आणखी काही दिवस पुण्यापर्यंतच :

लोणंद : कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस गेल्या दोन महिन्यांपासून पुण्यापर्यंतच धावत आहे. लोहमार्ग दुरुस्तीचे काम आणखी काही दिवस चालणार असल्याने कोयना एक्स्प्रेसचे वेळापत्रक पुन्हा रुळावर येण्यासाठी प्रवाशांना वाट पाहवी लागणार आहे. त्यामुळे मुंबई ते कोल्हापूर प्रवास करणाºया प्रवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.अतिवृष्टीमुळे मंकी हिल ते कर्जत लोहमार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईहून सकाळी सुटणारी कोयना एक्स्प्रेस बंद करण्यात आल्याने मुंबईहून कोल्हापूरकडे येणाºया प्रवाशांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. कोयना एक्स्प्रेस ही कोल्हापूरकडे जाणारी महत्त्वाची व दिवसा जाणारी एकमेव गाडी असल्याने प्रवाशांची या गाडीला प्रथम पसंती असते. मात्र, मध्य रेल्वेकडून मंकी हिल ते कर्जत या घाटक्षेत्रात विविध तांत्रिक तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे पुढील दहा दिवस अजूनही सुरू राहणार असल्याने या कालावधीत अनेक एक्स्प्रेससह पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस पुण्यातूनच सोडण्यात येणार आहे, अशी माहिती पुन्हा रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यातही रेल्वेकडून मंकी हिल येथे दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आली होती. त्यावेळीही काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मुसळधार पावसामुळे घाट क्षेत्रातील रेल्वेमार्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यावेळी भर पावसातच रेल्वेकडून दुरुस्तीची कामे करण्यात आली होती. पण या भागात आणखी काही कामे करणे आवश्यक असून, पुढील दहा दिवस ही कामे सुरू राहणार आहेत.

प्रत्येकवेळी मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस अंशत: रद्द करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. मुंबईला जाणासाठी व मुंबईहून येण्यासाठी प्रवाशांच्या पसंतीची असणारी कोयना एक्स्प्रेसचे वेळापत्रक पुन्हा केव्हा रुळावर येईल याकडे प्रवाशांच्या नजरा लागल्या आहेत. 

 

टॅग्स :railwayरेल्वेPuneपुणेSatara areaसातारा परिसर