शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोयना धरण पाणीसाठ्यात 5 टीएमसीने वाढ, महाबळेश्वरमध्ये विक्रमी पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 11:54 IST

महाबळेश्वरमध्ये विक्रमी 270 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

प्रमोद सुकरेकराड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. गेल्या चोवीस तासात झालेल्या उच्चांकी पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 5 टीएमसीने वाढ झाली आहे. एका दिवसात 4.70 टीएमसी पाण्याची आवक झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा 43.18 टीएमसी झाला आहे. तर महाबळेश्वरमध्ये विक्रमी 270 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.पाटण तालुक्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणात प्रतिसेकंद 55,182 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. वाढलेली आवक आणि पावसाचा जोर पाहता कोयना धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचा पायथा वीजगृहातून काल, बुधवारी (दि.13) सायंकाळी 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. अतिवृष्टीचा इशारा आणि वाढती आवक पाहता पायथा वीजगृहातील विसर्ग आणखी वाढू शकतो.गेल्या 24 तासात धरण पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वर येथे विक्रमी 270 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरनंतर नवजा येथे 121 मिलीमीटर आणि कोयनानगर येथे 112 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात सध्या 43.18 टीएमसी आणि पाणी पातळी 2099 फूट इतकी झाली आहे.प्रशासन सतर्कहवामान विभागाने सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे कोयना धरण व्यवस्थापन आणि सातारा जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पाणीपातळीत देखील वाढ होऊ शकते. तसेच धोकादायक भागांवर लक्ष ठेवण्यात आला आहे. भुस्खलनाची शक्यता असणार्‍या ठिकाणच्या नागरीकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यावर प्रशासनाचा भर दिसत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरणWaterपाणी