शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

कोयना धरण ६० टीएमसीच्या उंबरठ्यावर! ५६ टक्के भरले; कण्हेरमधून विसर्गात वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 01:12 IST

तर कण्हेर धरणक्षेत्रातही पाऊस सुरूच असल्याने विसर्गात वाढ करण्यात येत आहे...

नितीन काळेल -सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून, २४ तासांत महाबळेश्वरला १२४, तर कोयनानगरला ९० मिलिमीटरची नोंद झाली. यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढल्याने पाणीसाठा ५८.८१ टीएमसी झाला आहे. सुमारे ५६ टक्के धरण भरले. तर कण्हेर धरणक्षेत्रातही पाऊस सुरूच असल्याने विसर्गात वाढ करण्यात येत आहे.जिल्ह्यात मागील तीन आठवड्यांपासून पाऊस पडत आहे. जून महिन्यात दमदार पाऊस झाला, तर जुलै महिना सुरू झाल्यापासूनही पाऊस पडतच आहे. पूर्व भागात पावसाची उघडीप असलीतरी पश्चिमेकडे दमदार हजेरी आहे. यामुळे कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह कांदाटी खोऱ्यात ओढे, नाले भरभरून वाहू लागलेत. प्रमुख धरणांतील पाणीसाठाही वेगाने वाढू लागला आहे. परिणामी पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून विसर्ग करण्यात येऊ लागला आहे. त्यातच बहुतांशी मोठी धरणे ही ७० टक्क्यांपर्यंत भरलेली आहेत.

गुरुवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ९०, नवजाला ७३ आणि महाबळेश्वरला १२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे कोयना धरणात ३३ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते, तर धरणात ५८.८१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. सध्या धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू असून, त्यातूनच १ हजार ५० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. दरम्यान, एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगर येथे १ हजार ६९९ मिलिमीटर पाऊस झाला आहे, तर नवजाला १ हजार ४६७ आणि महाबळेश्वर येथे १ हजार ६३६ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे.

साताऱ्यात ढगाळ वातावरण...सातारा शहरात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. गुरुवारी सकाळी काही प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या. पण, बहुतांशीवेळा ढगाळ वातावरण तयार झालेले होते, तर सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात मात्र, पाऊस होत आहे. पूर्व भागात पावसाची उघडीप आहे.कण्हेरमधून विसर्ग वाढला... -कण्हेर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत चाललाय. सध्या धरणात ७.१९ टीएमसी पाणीसाठा आहे. धरण ७१ टक्के भरले आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी गुरुवारी दुपारपासून सांडव्यातून एक हजार क्यूसेक विसर्ग वाढविण्यात येणार होता. त्यामुळे वेण्णा नदीत सांडव्यावरून दोन हजार तसेच विद्युतगृहातून ७०० क्यूसेक पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे कण्हेरमधून एकूण २ हजार ७०० क्यूसेक विसर्ग होणार होता.

टॅग्स :DamधरणRainपाऊस