शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कोयना धरणाचे दरवाजे बंद, सातारा जिल्ह्यात घाट, धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 18:23 IST

तारळीतून २ हजार क्युसेक विसर्ग, नवजाला १६६ मिलीमीटरची नोंद 

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम घाट भाग आणि प्रमुख धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे तारळी धरणातून ही २ हजार क्युसेक विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर २४ तासांत नवजाला १६६ आणि महाबळेश्वरमध्ये १३७ मिलीमीटरची नोंद झाली आहे. तसेच प्रमुख ६ धरणांत सुमारे ११४ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. मागील काही दिवसांपासून कोयना धरणाच्या सहा वक्र दरवाजातून विसर्ग करण्यात येत होता. पण, गुरूवारी (दि.२४) धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.जिल्ह्यात पावसाचा जोर वाढू लागला आहे. पश्चिम भागात १० दिवसानंतर दमदार पाऊस कोसळू लागला आहे. विशेषतः करुन घाट भाग आणि धरणक्षेत्रात ही धो-धो पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात ही मोठी आवक होऊ लागल्याने पाणीसाठा वाढू लागला आहे. शुक्रवारी सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला ८७ मिलीमीटरची नोंद झाली आहे. तर नवजा येथे १६६ आणि महाबळेश्वरमध्ये १३७ मिलीमीटर पाऊस पडला आहे.सकाळच्या सुमारास धरणात २० हजार ७४९ क्युसेक वेगाने पाणी येत हाेते. तर धरणात ७८.३७ टीएमसी पाणीसाठा झाला होता. ७४.४६ पाणीसाठ्याची टक्केवारी आहे. तर २४ तासांत कोयना धरणात १.८० टीएमसी पाणी आले. तर धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. यामुळे सध्या पायथा वीजगृहातून २ हजार १०० क्युसेकच विसर्ग सुरू आहे.

पश्चिम भागातच कोयनासह धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी ही प्रमुख धरणे आहेत. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढलाय. धोम क्षेत्रात १९, बलकवडी ६५, उरमोडी धरणक्षेत्रात ३३ आणि तारळी येथे २२ मिलीमीटरची नोंद झालेली आहे. या धरणात सध्या ११३.८० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सुमारे ७७ टक्के ही धरणे भरली आहेत.दरम्यान, सातारा शहरासह तालुक्यातही पावसाची रिपरिप सुरू झालेली आहे. तर पूर्व भागात पावसाच्या झडी येत आहेत. यामुळे पूर्व भागात खरीप हंगामातील पिकांना या पावसाचा फायदा होणार आहे.

कोयना धरणाचे दरवाजे बंद..मागील काही दिवसांपासून कोयना धरणाच्या सहा वक्र दरवाजातून विसर्ग करण्यात येत होता. पण, गुरूवारी दरवाजे बंद करण्यात आले. त्यामुळे पायथा वीजगृहातून विसर्ग सुरू आहे. तर तारळी धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सुमारे २ हजार क्युसेक विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास प्रमुख ४ धरणांतून ३ हजार ८७१ क्युसेक पाणी विसर्ग सुरू होता.