Satara: कोयना धरण ८० टक्के भरले, पावसाने पुन्हा दडी मारली
By नितीन काळेल | Updated: August 16, 2023 13:10 IST2023-08-16T13:09:22+5:302023-08-16T13:10:29+5:30
महाबळेश्वरला अवघा १४ मिलीमीटर पाऊस

Satara: कोयना धरण ८० टक्के भरले, पावसाने पुन्हा दडी मारली
सातारा : मागील दीड महिन्यापासून पश्चिमेकडे दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने पुन्हा दडी मारली आहे. बुधवारी सकाळपर्यंत तर महाबळेश्वरला अवघा १४ मिलीमीटर पाऊस पडला. तर पावसाअभावी कोयनेत येणाऱ्या पाण्याची आवक घटली आहे. असे असलेतरी धरणातील पाणीसाठ्याने ८४ टीएमसीचा टप्पा पार केला आहे. टक्केवारीत हे प्रमाणत ८०.११ इतके झाले आहे.
बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला अवघा ५ आणि नवजा येथे ६ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर एक जूनपासून सर्वाधिक पाऊस हा नवजाला ४६१९ मिलीमीटर झाला. तर कोयनेला ३२२७ आणि महाबळेश्वरमध्ये ४३०५ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात ४३११ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ८४.३२ टक्के झाला होता. त्याचबरोबर मागील आठवड्यापासून कोयना धरणातून होणारा विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.