शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोयना धरण १०० टक्के भरले! पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची चिंता मिटली 

By प्रमोद सुकरे | Updated: September 8, 2022 05:51 IST

कोयना धरणात आज सायंकाळी 100.6 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती.

कराड - महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यासाठी वरदायिनी ठरणाऱ्या कोयना धरणातीलपाणीसाठ्याने आज सायंकाळी पाच वाजता शंभर टीएमसीचा टप्पा पार केला. यामुळे महाराष्ट्रातील उद्योगविश्वाला मोठा दिलासा मिळाला आहे. तर आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील सिंचनाची चिंता मिटली आहे. सध्या धरण पाणलोट क्षेत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असून धरणात प्रतिसेकंद 1234 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. 

कोयना धरणात आज सायंकाळी 100.6 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे आवकही बंद होती. तसेच धरणाचे वक्र दरवाजे आणि पायथा वीज गृहातील विसर्ग देखील काही दिवसांपुर्वी बंद केलेला आहे. परतीचा पाऊस काळ लक्षात घेऊन धरण व्यवस्थापनाने पाणी पातळी नियंत्रित ठेवली होती. अखेर आज पाणीसाठ्याने शंभरी गाठली. 

पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची चिंता मिटली -कोयना धरणातील पाण्यावर तयार होणारी वीज राज्यातील उद्योगांना पुरवली जाते. तसेच पिण्याच्या पाण्यासह पुर्वेकडील सिंचनाची गरज देखील पूर्ण केली जाते. धरण पाणलोट क्षेत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. बुधवारी दिवसभरात कोयनानगर येथे 13 मिलीमीटर, नवजा येथे 18 मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे 4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाची पाणी पातळी 658 मीटर झाली आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणीRainपाऊसSatara areaसातारा परिसर