CoronaVirsu Satara Updates-जिल्ह्यात कोरानामुळे आणखी सातजणांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 19:41 IST2021-04-06T19:40:27+5:302021-04-06T19:41:36+5:30
CoronaVirsu Satara Updates- सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, गत चोवीत तासात नवे ५१४ रुग्ण आढळून आले असून, यामध्ये सातजणांचा बळी गेला आहे. यामुळे बळींची संख्या १ हजार ९३१ इतकी झाली असून, बाधितांचा आकडा ६९ वर पोहोचला आहे.

CoronaVirsu Satara Updates-जिल्ह्यात कोरानामुळे आणखी सातजणांचा बळी
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, गत चोवीत तासात नवे ५१४ रुग्ण आढळून आले असून, यामध्ये सातजणांचा बळी गेला आहे. यामुळे बळींची संख्या १ हजार ९३१ इतकी झाली असून, बाधितांचा आकडा ६९ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा कहर सुरू झाल्याने जिल्हावासियांसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे. जिल्ह्यात रुग्ण वाढू लागल्याने प्रशासनावरचा ताण वाढू लागला आहे. मंगळवारी जिल्ह्यामध्ये १ हजार १०४ स्वॅबची तपासणी करण्यात आली. यामध्ये ५१४ जण बाधित आढळून आले. यामध्ये सातजणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये साताऱ्यातील सदर बझारमधील ८२ वर्षीय महिला, कोडोली, ता. सातारा येथील ७२ वर्षीय पुरुष, विखळे, ता. कोरेगाव येथील ६७ वर्षीय पुरुष, नित्रळ, ता. कोरेगाव येथील ७२ वर्षीय पुरुष, भुइज, ता. वाइ येथील ५३ वर्षीय पुरुष, ललगुण, ता. खटाव येथील ५५ वर्षीय आणि साताऱ्यातील ७४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने प्रशासनाची धावपळ सुरु झाली आहे. बंद पडलेली कोरोना सेंटर पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याने नातेवाइकांची घालमेल होत आहे. गत वर्षीसारखी यंदाही परिसैथती झाली असून, प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. गत काही दिवसांपूर्वी दिवसाला आठ हजार जणांना लस दिली जात होती. मात्र, आता हा वेग वाढविण्यात आला असून, दिवसाला तब्बल २१ हजार जणांना लस दिली जात आहे. हा लसीचा वेग आणखी वाढविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. जिल्ह्यात आत्तापर्यंत ६१ हजार ७४० जण कोरोनातून मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या ५ हजार ५६२ कोरोना बाधित रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
मास्क न लावणाऱ्या तब्बल १२ हजार जणांवर कारवाइ
जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यानंतर प्रशासनाने कडक नियम अवलंबले. जिल्ह्यात गत दीड महिन्यात मास्क न घालणाऱ्या तब्बल १२ हजार जणांवर दंडात्मक कारवाइ करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली. अशाप्रकारची कारवाइ सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करून बन्सल म्हणाले, वाइ तालुक्यातील बावधन येथील बगाड यात्रेला जमलेला जनसुमदायाची खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. जे दोषी आढळलतील त्यांच्यावर नक्कीच कारवाइ करण्यात येणार आहे.