कोकणचा आंबा कऱ्हाडात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 11:34 AM2021-04-26T11:34:11+5:302021-04-26T11:36:30+5:30

Karad HapusMango Satara : कऱ्हाड शहरात देवगड हापूस विक्रीसाठी दाखल झाला आहे. आवक कमी असल्याने तेराशे ते सोळाशे रुपये डझन, याप्रमाणे आंब्यांची विक्री होत आहे. आवक कमी असल्याने आंब्याचे दर काही दिवस चढेच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Konkan Mango Filled in Karhada | कोकणचा आंबा कऱ्हाडात दाखल

कोकणचा आंबा कऱ्हाडात दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देकोकणचा आंबा कऱ्हाडात दाखलदर तेराशे ते सोळाशे रुपयापर्यंत डझन, याप्रमाणे विक्री

कऱ्हाड : शहरात देवगड हापूस विक्रीसाठी दाखल झाला आहे. आवक कमी असल्याने तेराशे ते सोळाशे रुपये डझन, याप्रमाणे आंब्यांची विक्री होत आहे. आवक कमी असल्याने आंब्याचे दर काही दिवस चढेच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

गत महिन्यात २ हजार २०० रुपये डझन याप्रमाणे आंबा विकला गेला. आता तो दर तेराशे ते सोळाशे रुपयापर्यंत खाली आला आहे. कऱ्हाडात देवगड हापूस व पायरी आंब्याचे काही व्यापारी प्रसिद्ध आहेत. संबंधित विक्रेते कोकणातून हापूस व पायरी आंबा विक्रीसाठी आणतात.

पुणे, मुंबईसह परदेशातही त्यांचा आंबा जातो. आंबा खराब झाल्यास तो बदलून दिला जात असल्याने, ग्राहक या ठिकाणाहून आंबा खरेदी करताना दिसतात. देवगड आंबा खारकीप्रमाणे वाळत जातो, पण तो खराब होत नाही, असे संबंधित विक्रेते सांगतात. त्यामुळे ते आंबा खराब निघाल्यास बदलूनही देत आहेत.

Web Title: Konkan Mango Filled in Karhada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.