कोयनानगर भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 14:50 IST2019-12-23T14:47:21+5:302019-12-23T14:50:10+5:30
कोयनानगर, ता. पाटण येथे सोमवारी सकाळी सहा वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. यामुळे झोपेत असलेल्या नागरिकांची घाबरगुंडी उडाली.

कोयनानगर भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरले
ठळक मुद्देकोयनानगर भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरले झोपेत असलेल्या नागरिकांची घाबरगुंडी
सातारा : कोयनानगर, ता. पाटण येथे सोमवारी सकाळी सहा वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. यामुळे झोपेत असलेल्या नागरिकांची घाबरगुंडी उडाली.
कोकण किनारपट्टीसह, पाटण परिसर या भूकंपाने हादरला आहे. भूकंपाचा हादरा बसत असल्याचे जाणवल्यानंतर नागरिक घराबाहेर आले. या भूकंपाचा केंद्रबिंदू नेमका कुठे होता, हे अद्याप समोर आले नाही.