Knife attack on one at Kodoli | कोडोली येथे एकावर चाकूहल्ला

कोडोली येथे एकावर चाकूहल्ला

सातारा : मजुरीचे पैसे दिले नाहीत, या रागातून देगाव येथील गवंडीकाम करणाऱ्या व्यक्तीवर चाकूहल्ला करणाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. एका दिवसाच्या मजुरीचे पैसे दिले नाहीत म्हणून देगाव येथील गवंडीकाम करणाऱ्या विजय फणसे यांच्यावर चाकूने हल्ला करून जखमी केले. ही घटना शुक्रवार, ५ मार्च रोजी दुपारच्या सुमारास कोडोली येथे घडली. या प्रकरणी मोहन साळुंखे याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, विजय श्रीरंग फणसे (वय ४८, रा. देगाव, जि. सातारा) हे गवंडीकाम करतात. त्यांच्याकडे मोहन साळुंखे (रा. देगाव, ता. सातारा) हा मजुरी करत होता. मात्र, विजय फणसे यांनी मोहन याला त्याची एका दिवसाची मजुरी दिली नव्हती. ती मजुरी देण्यात यावी म्हणून तो शुक्रवारी विजय यांच्याकडे गेला आणि मजुरी मागितली. मात्र, आता माझ्याकडे पैसे नाहीत, तुला नंतर देतो, असे त्यांनी मोहनला सांगितले. मात्र, मोहनला याचा राग आला आणि त्याने तेथेच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर तो येथून निघून गेला आणि थोड्या वेळाने पुन्हा त्यांनी कोडोली येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेसमोर विजय फणसे यांना शिवीगाळ करत दमदाटी केली आणि चाकूने हल्ला करत डाव्या हातावर जखम केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार विजय गायकवाड करत आहेत.

Web Title: Knife attack on one at Kodoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.