शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

'किसन वीर' कारखाना निवडणूक निकाल: राष्ट्रवादीच्या नितीन पाटलांची आघाडी, मदन भोसले पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 15:54 IST

या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर बचाव शेतकरी परिवर्तन पॅनेल विरूध्द माजी आमदार मदन भोसले यांचे शेतकरी विकास पॅनेल अशी चुरशीची लढत झाली.

सातारा : किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणुकीत कवठे-खंडाळा व भुईंज या सोसायटी गटातही आमदार मकरंद पाटील यांच्या किसन वीर बचाव शेतकरी पॅनेलच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. यामध्ये कवठे-खंडाळा गटात नितीन पाटील यांनी १०,८७८ मते घेऊन आघाडीवर असून भुईंज गटात माजी आमदार मदन भोसले (७०८१ मते) पिछाडीवर आहेत.किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ६९ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर बचाव शेतकरी परिवर्तन पॅनेल विरूध्द माजी आमदार मदन भोसले यांचे शेतकरी विकास पॅनेल अशी चुरशीची लढत झाली. आज वाई एमआयडीसीतील श्रीनिवास मंगल कार्यालयात मतमोजणी सुरू आहे. एकुण १५४ मतदान केंद्रांपैकी ७७ मतदान केंद्रांची मतमोजणी सध्या सुरू आहे.या पहिल्या फेरीतील मतमोजणीत आमदार मकरंद पाटील यांच्या पॅनेलने राखीवच्या तीन व महिला दोन जागांवर आघाडी घेतली आहे. तसेच गटाच्या मतमोजणीत कवठे-खंडाळा गटा किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेलचे रामदास गाढवे १०८०६, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन जाधव पाटील यांना १० ८७८, किरण राजाराम काळोखे १०५७१ मते मिळून त्यांनी आघाडी घेतली आहे. तर विरोधी मदन भोसले यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलच्या दत्तात्रेय गाढवे यांना ६८६३, प्रवीण विनायक जगताप ७८०६, प्रताप ज्ञानेश्वर यादव ६८०१ मते मिळाली आहे.भुईंज गटात मकरंद पाटील यांच्या पॅनेलच्या प्रकाश धुरगुडे यांना १०५८३, रामदास महादेव इथापे १०४९७, प्रमोद भानुदास शिंदे यांना १०४५८ मते मिळून आघाडी घेतली आहे. तर शेतकरी विकास पॅनेलच्या जयवंत पवार ६८९५, दिलीप शिंदे ६६६९, मदन प्रतापराव भोसले ७०८१ मते मिळाली आहेत. तर अपक्ष मानसिंग नारायण शिंगटे यांना ७५ मते मिळाली आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेस