शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

राजे, तुम्ही कॉलर उडवाच..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 9:36 PM

लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांची कॉलर उडविण्याची स्टाईल चर्चेची ठरली. कºहाडच्या सभेत तर चक्क शरद पवारांनीच कॉलर उडवून स्टाईलला पोचपावती दिली. सोशल मीडियाने ही कॉलर देशभरात पोहोचविली. राजेंनी स्टाईलने कॉलर उडवून मैदान मारलं; पण लोकांच्या मनातील प्रश्न अनुत्तरीतच राहिलं..!

ठळक मुद्देविकासाच्या त्यांच्या मार्गातील असले दगड-धोंडे बाजूला सरतील असं बघा आणि मग, ‘होय राजे तुम्ही कॉलर उडवाच..!

-प्रगती जाधव-पाटीललोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांची कॉलर उडविण्याची स्टाईल चर्चेची ठरली. कºहाडच्या सभेत तर चक्क शरद पवारांनीच कॉलर उडवून स्टाईलला पोचपावती दिली. सोशल मीडियाने ही कॉलर देशभरात पोहोचविली. राजेंनी स्टाईलने कॉलर उडवून मैदान मारलं; पण लोकांच्या मनातील प्रश्न अनुत्तरीतच राहिलं..!

गत लोकसभा निवडणुकीतील तब्बल साडेतीन लाखांचं लीड यंदा का बरं कमी झालं, वाढलेले दोन लाख नवमतदार गेले कुठे? मतदारांनी का फारकत घेतली? याचा शोध राजे तुम्ही घ्या; तो भोवतालच्या माणसांकडून न घेता थेट मतदारांकडून घ्या. मताधिक्य घटण्यामागची कारणं उमगतील, तुम्ही त्यावर अंमल कराल त्यावेळी राजे तुम्ही कॉलर उडवाच..!

‘पेन्शनर सिटी’चं साताऱ्याला चिकटलेलं बिरुद हे भूषण नव्हे, तुम्हीपण जाणता. पैलतिराकडे झुकलेल्या पालकांना घरात सोडून शिक्षण-नोकरीसाठी पुण्या-मुंबईची वाट धरणारे तरुणाईचे लोंढे पुन्हा वळायचं म्हणतात. १४-१४ वर्षे टोल भरत सोमवार-शुक्रवार अप-डाऊन करणारी ही पिढी बेजार झालीये. त्यांच्या पात्रतेच्या नोकºया इथं नाहीत. आपल्या साताºयात दर्जेदार उच्च शिक्षण, रोजगारासाठी पूरक वातावरण तुम्ही इथं करा आणि मग, ‘राजे तुम्ही कॉलर उडवाच..!’

उरमोडी धरणाचे पाणी शिवारापर्यंत पोहोचेल याकडे दुष्काळी भागातील जनता आस लावून आहे. दोन पंचवार्षिक संपल्या आपण हा विषय जाहीरनाम्यातून बाहेर कधी आणलाच नाही. दुष्काळी जनतेला हक्काचे पाणी मिळाले, चारा छावण्यांची गरजच संपली तर, ‘होय राजे तुम्ही कॉलर उडवाच..!’

जागतिक वारसा स्थळाचं कोंदण असलेलं कास आता भकास होऊ लागलंय. तिथं वाढलेले सिमेंटचे जंगल आपल्याही नजरेतून सुटलेले नाही. लोकांनी रोजगार करावा आणि मोठं व्हावं; पण हे होत असताना त्यांनी निसर्गाशी केलेला खेळ आपण आपल्या ‘दबंग’ स्टाईलने दुरुस्त करावा आणि मग ‘राजे तुम्ही कॉलर उडवाच..!’

अवघ्या जिल्ह्यातील तरुणाई तुमची दिवाणी आहे. तुमचा डायलॉग त्यांच्यासाठी ईश्वरवाणी आहे. एका सेल्फीसाठी ती तुमच्यावर मरती आहे. तरुणांचे बड्डे केक कापण्याबरोबरच करिअरविषयी त्यांना जागरूक करा. त्यांच्या मनातील ‘धुमश्चक्रीची भीती’ घालवून साताºयातील वातावरण निवळू द्या. तुमच्या मार्गदर्शनाने त्या मातीच्या गोळ्यांना आकार मिळाला तर ‘राजे तुम्ही कॉलर उडवाच..!’इथल्या आया-बायांसाठी तुम्ही बंधुतूल्य अन् लेकरा समान भासता; पण आपली भेट घ्यायची म्हटलं की ‘महाराजांचा मूड नाय..’ हे शब्द ऐकले की अस्वस्थ होतं. कामासाठी हेलपाटे पडतात तेव्हा मन उदास होतं. तुम्ही साताºयात खरंच २४ बाय ७ उपलब्ध असाल आणि लोकांची गाºहाणी ऐकाल तेव्हा, ‘होय राजे तुम्ही कॉलर उडवाच..!’

सावलीला पण आपली शंका येऊ नये इतकं सजग सार्वजनिक जीवनात कसं वागावं याचं तंत्र तीन दशकांत अवगत केलं. आपलं खासगी आयुष्य सार्वजनिक झाल्याने प्रतिमेला धक्का बसत आहे. काय म्हणताहेत तुमचे खासदार!’ असे बाहेरच्यांचे कुत्सित प्रश्न सातारकरांना सतावताहेत. यंदा ‘हॅट्ट्रिक’च्या निमित्ताने खासगी बाबी सार्वजनिक होणार नाहीत अशी ‘कमिटमेंट’ द्या आणि मगच, ‘होय राजे तुम्ही कॉलर उडवाच..!’

रात्री-अपरात्री शहरातून फेरफटका मारून रयतेची ख्यालीखुशाली पुसणारे आपण जाणते राजे आहात. पण, याच रयतेला दिवसा दोन वेळच्या अन्नपाण्यासाठी काय-काय सोसावं लागतं हे जाणून घ्या. सहज, सुंदर जीवन जगण्याच्या त्यांच्या हक्कात माती कालवणारे बाजारबुणगे, विकासाच्या त्यांच्या मार्गातील असले दगड-धोंडे बाजूला सरतील असं बघा आणि मग, ‘होय राजे तुम्ही कॉलर उडवाच..!

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसर