शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Satara: शिरवळमधून अपहरण केलेल्या कामगाराची सुटका, आरोपींच्या अवघ्या सात तासांत मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 16:13 IST

शिरवळ : शिरवळ येथील एका सर्व्हिस रोडवर जुनी दुचाकी चोरल्याच्या संशयावरून व आर्थिक व्यवहारातून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी वराह देखभाल ...

शिरवळ : शिरवळ येथील एका सर्व्हिस रोडवर जुनी दुचाकी चोरल्याच्या संशयावरून व आर्थिक व्यवहारातून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी वराह देखभाल करणाऱ्या कामगाराला कारमधून अपहरण केले. पुणे जिल्ह्यात घेऊन गेलेल्या पाच आरोपींच्या मुसक्या शिरवळ पोलिसांनी अवघ्या सात तासांत आवळल्या. शिरवळ पोलिसांनी भरत लक्ष्मण वाघमारे (वय ३६, मूळ रा. माळेगाव नसरापूर, ता. भोर, सध्या रा. पळशी ता. खंडाळा) या कामगाराची सुटका करीत पाच अपहरणकर्त्यांना अटक केली आहे.घटनास्थळ व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरवळ येथील उद्योजक दत्तात्रय माने यांचे वराह पालनाचा व्यवसाय आहे. माने यांच्याकडे वराह देखभालसाठी भरत वाघमारे हा कामगार म्हणून कार्यरत आहे. दरम्यान, शनिवार दि. २० रोजी सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांच्या दरम्यान सातारा ते पुणे जाणाऱ्या रस्त्यावर शिरवळ हद्दीतील एका कॅन्टीनमधून वराहसाठी खाद्य आणण्यासाठी तीनचाकी टेम्पोमधून निघालेल्या भरत वाघमारे याला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी अडवून एका कारमधून अपहरण केले. अशी फिर्याद शिरवळ पोलिस स्टेशनला दत्तात्रय माने यांनी दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फलटणचे पोलिस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे, पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे, सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले, कीर्ती म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके केली. अपहरण झालेला कामगार भरत वाघमारे व अपहरणकर्ते हे पुणे जिल्ह्यातील मुळशी लगत नांदगाव हद्दीत डोंगराळ भागात असल्याची माहिती मिळताच तत्काळ पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने शोधमोहीम राबविली.अपहरण झालेला कामगार भरत वाघमारे याची सुटका करीत अपहरणकर्ते नंदकुमार चंद्रकांत शिंगटे-जाधव (वय ४२), प्रतीक चंद्रकांत शिंगटे-जाधव (२६, दोघे रा. खडकी ता. वाई), गणेश शिवाजी पांचगने (२७, रा. सारोळा, ता. जामखेड), युवराज जालिंदर गायकवाड (५२, रा. राजुरी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर), रमेश परसराम बहीर (३६, रा. नाव्हली ता. जामखेड) यांच्या मुसक्या मोठ्या शिताफीने आवळल्या. यावेळी संबंधितांना खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सहायक पोलिस निरीक्षक कीर्ती म्हस्के तपास करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Laborer rescued, kidnappers arrested within seven hours in Shirwal.

Web Summary : A laborer was kidnapped from Shirwal over a bike theft suspicion and financial dispute. Police rescued him and arrested five kidnappers within seven hours near Pune. All suspects are in police custody.