किडगावच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By Admin | Updated: October 25, 2015 00:35 IST2015-10-25T00:35:52+5:302015-10-25T00:35:52+5:30

ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या

Kidgawan girl's suicide | किडगावच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

किडगावच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

किडगाव : सातारा तालुक्यातील किडगाव येथील वैष्णवी तानाजी इंगवले (वय १६) या विद्यार्थिनीने अभ्यासाच्या तणावामुळे आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी घरात ओढणीने गळफास घेऊन तिने आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
वैष्णवी इंगवले ही नेले-किडगाव (ता. सातारा) येथील भैरवनाथ विद्यालयात अकरावी शास्त्र शाखेत शिकत होती. ती अभ्यासात हुशार होती. दहावीच्या परीक्षेत तिला ९३ टक्के गुण मिळाले होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास अभ्यास व परीक्षेच्या तणावातून तिने घरी ओढणीने गळफास घेतला. त्यानंतर तिला सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजू मुलाणी तपास करीत आहेत. कुटुंबीयांकडे चौकशी केली असता अभ्यासाच्या तणावातून वैष्णवीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Kidgawan girl's suicide