शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

खटाव तालुक्यात शिक्षक संघाला भगदाड, वडूजमध्ये मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 4:23 PM

खटाव तालुका प्राथमिक शिक्षक समितीचा जाहीर मेळावा वडूजमध्ये झाला. संघटनेची बांधणी मजबूत करण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला. मेळाव्यात शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष विद्यासागर माने यांच्यासह सुमारे वीस कार्यकर्त्यांनी समितीमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे शिक्षक संघास खिंडार पडल्याची चर्चा शिक्षक वर्गात आहे.

ठळक मुद्देखटाव तालुक्यात शिक्षक संघाला भगदाड, वडूजमध्ये मेळावातालुकाध्यक्ष विद्यासागर माने यांच्यासह सुमारे २० कार्यकर्त्यांचा समितीत प्रवेश

वडूज : खटाव तालुका प्राथमिक शिक्षक समितीचा जाहीर मेळावा वडूजमध्ये झाला. संघटनेची बांधणी मजबूत करण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला. मेळाव्यात शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष विद्यासागर माने यांच्यासह सुमारे वीस कार्यकर्त्यांनी समितीमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे शिक्षक संघास खिंडार पडल्याची चर्चा शिक्षक वर्गात आहे.समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, जिल्हाध्यक्ष शंकरराव देवरे यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला. यावेळी राजन कोरेगावकर, प्रदीप कदम, संतोष घोडके, संचालक किरण यादव, चंद्रकांत मोरे, बँकेचे माजी उपाध्यक्ष कांतआण्णा फडतरे, विश्वंभर रणनवरे, विठ्ठलराव फडतरे, शशिकांत बागल, संजय तिडके, अरुण खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.शिंदे म्हणाले, खटाव तालुका हा समितीचा बालेकिल्ला होता. अपवाद वगळता या तालुक्याने शिक्षक बँक व इतर संघटना पातळीवरील लढाईत नेहमीच समितीला भक्कम पाठबळ दिले आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे मागच्या वेळेस निवडणुकीत एक जागा कमी झाली. मात्र आत्ता नवीन होतकरू कार्यकर्त्यांनी संघटनेची मजबूत बांधणी करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे निश्चितपणे भविष्यकाळात परिवर्तन होईल.या मेळाव्यात संघाचे अध्यक्ष सागर माने यांच्यासह प्रसाद महामुनी, दत्तात्रय सावंत, संग्राम गोसावी, नंदराज हडस, संदीप चंदनशिवे, हणमंत जाधव, सतीश खाडे, बाबासाहेब केदार, प्रभाकर गायकवाड, आनंदराव खाडे, सुभाष सलगर, अनिता माने, योगिता गोसावी, सीमा चंदनशिवे, आशा खाडे, स्वाती जाधव आदींनी समितीमध्ये जाहीर प्रवेश केला.तालुकाध्यक्ष अर्जुन यमगर, सरचिटणीस नवनाथ जाधव यांनी स्वागत केले. रणनवरे यांनी प्रास्ताविक केले. आबासाहेब जाधव यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष शिवाजी लखापते, माजी सरचिटणीस विजय गोरे, किरण गोडसे, पोपट माळवे, उमेश पाटील, गोविंद माळवे, सुनील खाडे यांच्यासह शेकडो शिक्षक उपस्थित होते.गटबाजीला कंटाळून प्रवेश....गेली अनेक वर्षे आपण शिक्षण संघामध्ये प्रामाणिक काम केले. अडचणीच्या काळात बँकेची निवडणूकही लढविली. मात्र अलीकडच्या काळात संघटनेत मोठ्या प्रमाणावर गटबाजी वाढली आहे. या गटबाजीमुळे तळागळात काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होत आहे. या प्रकारास कंटाळून आपण शिक्षक समितीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे, असे मत सागर माने यांनी यावेळी व्यक्त केले. 

टॅग्स :Teacherशिक्षकSatara areaसातारा परिसर