नितीन काळेलसातारा : सातारा जिल्हा परिषदेचा निकाल जाहीर झाला असून बहुमत नसले तरी भाजप अध्यक्षपद मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यामध्ये कराड तालुका अध्यक्षपदाचा केंद्रबिंदू ठरत असून भाजपच्या ओबीसी प्रवर्गातील दोन महिला सदस्या निवडून आल्या आहेत. तसेच माण तालुक्यातून ही प्रयत्न होणार आहेत. तर ओबीसी महिलांसाठी ९ गट राखीव होते. यामधून भाजपच्या चाैघीजणी, राष्ट्रवादी तीन आणि शिंदेसेनेच्या दोन महिला उमेदवार निवडून आल्या असून राजकीय उलथापालथीत खटाव किंवा पाटणलाही अध्यक्षपदाची संधी मिळू शकते.सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक तब्बल नऊ वर्षांनी झाली. पहिल्या अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. झेडपीत ओबीसी प्रवर्गातून एकूण १७ जण निवडून जाणार होते. यामधील ९ गट महिलांसाठी आरक्षित होते. यामध्ये जावळी, सातारा आणि कोरेगाव तालुक्यांत प्रत्येकी एक गट तसेच खटाव, पाटण अन् कराड तालुक्यांत प्रत्येकी दोन गट आरक्षित होते. तसेच माण तालुक्यातील आंधळी गट हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव होता. मात्र, येथून भाजपकडून ओबीसी प्रवर्गातील सोनल गोरे निवडून आल्या आहेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या त्या भावजय आणि शेखर गोरे यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे सोनल गोरे याही अध्यक्षपदाच्या शर्यतीत राहणार आहेत.खटाव तालुक्यातील औध गटात ही ओबीसी महिला आरक्षण होते. येथे राष्ट्रवादीच्या मनिषा फडतरे विजयी झाल्या आहेत. तर मंत्री गोरे यांच्या भावजय व भाजपच्या उमेदवार भारती गोरे यांचा त्यांनी पराभव केला. पाटण तालुक्यात मल्हारपेठ आणि मारुली हवेली गट ओबीसी महिलांसाठी राखीव होते. येथे शिंदेसेनेने ताकद लावली होती. मल्हारपेठ मधून शिंदेसेनेकडून विजया कुंभार तर मारुल हवेलीत शिंदेसेनेच्याच योगिता गिरी विजयी झाल्या आहेत. पण, भाजपकडे सदस्यबळ अधिक असल्याने शिंदेसेनेकडे अध्यक्षपद जाण्याची शक्यता दुसर असलीतरी राजकीय घडामोडीत ते अशक्यही नाही.खटाव तालुक्यात बुध गटही ओबीसी महिलांसाठी राखीव होता. येथे राष्ट्रवादीच्या लता कर्णे विजयी झाल्या. खटाव मधून राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून ओबीसी प्रवर्गातील दोन महिला निवडून आल्या असल्यातरी त्यांनाही अध्यक्षपदाची संधी आहे. पण, राजकीय घडामोडी काय होतात, यावरही राष्ट्रवादीचे अध्यक्षपदाचे स्वप्न साकार होणार का हे स्पष्ट होणार आहे.
शिवेंद्रसिंहराजे काय करणार ?सातारा तालुक्यात कोडोली गटही ओबीसी महिलेसाठी राखीव होता. भाजपच्या नीता खरात विजयी झाल्या आहेत. तर जावळीत कुडाळ गटातून भाजपच्या जयश्री गिरी ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या आहेत. या दोघीही अध्यक्षपदासाठी दावेदार ठरु शकतात. पण, त्यासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना ताकद लावावी लागणार आहे.
कराडला अधिक संधी...कराड तालुक्यात विंग आणि काले हे दोन गट ओबीसी महिलेसाठी राखीव होते. विशेष म्हणजे, हे दोन्ही गट कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष व आमदार डाॅ. अतुल भोसले हे या मतदारसंघाचे नेतृत्व करतात. यातील विंग गटातून भाजपच्या शैलजा शिंदे आणि कालेमधून भाजपच्याच मनिषा पाटील विजयी झाल्या आहेत. जिल्ह्यात भाजपचे दोन मंत्री आहेत. त्या तुलनेत आमदार डाॅ. भोसले यांना मंत्रिपद मिळाले नाही. तसेच त्यांनी मतदारसंघात ताकद वाढवली आहे. यामुळे ते कराडला अध्यक्षपद मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत.
राष्ट्रवादी-शिंदेसेना एकत्र आल्यास भाजपला फटका...या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक २७ सदस्य निवडून आले आहेत. सत्ता स्थापनेसाठी सहा जागा हव्या आहेत. बहुमताची मॅजिक फिगर ३३ आहे. अशावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिंदेसेना एकत्र आल्यास दोघांचे संख्याबळ ३५ होते. अशी उलथापालथ झाल्यास भाजपला फटका बसू शकतो.
Web Summary : BJP eyes Satara ZP President post, focusing on Karad. Alliances crucial; NCP-Shinde Sena unity could challenge BJP's dominance. Khatav, Patan also in race.
Web Summary : भाजपा की निगाहें सतारा ZP अध्यक्ष पद पर, कराड पर ध्यान केंद्रित। गठबंधन महत्वपूर्ण; NCP-शिंदे सेना की एकता भाजपा के प्रभुत्व को चुनौती दे सकती है। खटाव, पाटन भी दौड़ में।