शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
3
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
4
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
5
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
6
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
7
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
8
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
9
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
10
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
11
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
12
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
13
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
14
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
15
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
16
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
17
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
18
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
19
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
20
औषधांच्या कठाेर गुणवत्ता तपासणीसाठी आता कायदा; विषारी सिरप प्रकरणानंतर केंद्र सरकारने घेतला निर्णय

पावसाने साथ दिलीय, आता नशीब अजमावणार; सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अडीच लाख हेक्टरवर 

By नितीन काळेल | Updated: July 12, 2024 19:09 IST

८७ टक्के क्षेत्रावर पूर्ण; चांगल्या पावसाचा परिणाम 

सातारा : जिल्ह्यातील खरीप हंगाम पेरणी अंतिम टप्प्यात असून अडीच लाख हेक्टरवर पूर्ण झाली आहे. हे प्रमाण ८७ टक्के इतके झाले आहे. त्यामुळे यंदा चांगल्या पावसामुळे वेळेत पेरणी पूर्ण होणार असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात खरीप आणि रबी असे दोन हंगाम मोठ्या प्रमाणात घेण्यात येतात. जिल्ह्यातील खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये भाताचे सुमारे ४४ हजार हेक्टर, खरीप ज्वारी ११ हजार, बाजरी ६० हजार ७३४ हेक्टर, मका १४ हजार ३६९, भुईमूग २९ हजार ४३५ आणि सोयाबीनचे सर्वाधिक ७४ हजार ८०० हेक्टर राहणार असल्याचा अंदाज आहे, तसेच तूर, मूग, उडीद, कारळा, सूर्यफुलाचे क्षेत्र अत्यल्प आहे.मान्सूनच्या पावसावरच खरीप हंगाम घेण्यात येतो. पाऊस वेळेत आणि चांगला झाला तर पेरणी लवकर होते. यंदा पावसाला वेळेवर आणि दमदार सुरुवात झाली. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीही वेळेवर सुरू झाली, तसेच पेरणीला वेगही आला होता. त्यामुळे आतापर्यंत ८७ टक्क्यांवर पेरणी पूर्ण झालेली आहे. सध्या २ लाख ५० हजार ७५१ हेक्टर क्षेत्रावर पीक आहे. यामुळे लवकरच पेरणी पूर्ण होणार आहे.आतापर्यंत भाताची ५६ टक्के लागण झालेली आहे. २४ हजार ४९२ हेक्टरवर लागण करण्यात आली आहे. अजूनही पश्चिम भागात भात लागणीची कामे सुरूच आहेत, तर ज्वारीची ६ हजार ८१० हेक्टरवर पेरणी झाली. हे प्रमाण ६१ टक्के आहे. बाजरीची पेरणी ६४ टक्के झाली आहे. सुमारे ३९ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून यंदा या पिकाखालील क्षेत्र कमी होण्याचा अंदाज आहे.मका पिकाची सर्वाधिक ९५ टक्के क्षेत्रावर पेर झाली आहे. १४ हजार ३६९ हेक्टर पेरणी झाली आहे, तर भुईमुगाची ९१ टक्के म्हणजेच सुमारे २७ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. यंदाही सोयाबीन क्षेत्र वाढणार आहे. आतापर्यंत सुमारे ८७ हजार हेक्टरवर पेरणी झाली. हे प्रमाणत ११६ टक्के झाले आहे. सोयाबीनला बऱ्यापैकी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे असल्याचे दिसून येत आहे.

खंडाळा तालुक्यात १२७ टक्के क्षेत्रावर पेरणी..जिल्ह्यात यावर्षी वेळेत पाऊस सुरू झाल्याने पेरणीलाही वेग आला. त्यामुळे खंडाळा तालुक्यात आतापर्यंत १२७ टक्के पेरणी झालेली आहे. तालुक्यातील खरीप क्षेत्र १० हजार ५५६ हेक्टर आहे, तर पेरणी १३ हजार ४५० हेक्टरवर झाली आहे. सातारा तालुक्यात १८ हजार हेक्टरवर पेरणी झाली. हे प्रमाण ८६ टक्के आहे. जावळीत ११ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून ६१ टक्के प्रमाण राहिले आहे, तसेच पाटण तालुक्यातील ४० हजार ३६२ हेक्टरवर पेर झाली आहे. कऱ्हाड तालुक्यात ९२ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. सध्या ३५ हजार हेक्टरवर पिके आहेत.कोरेगाव तालुक्यात ९० टक्के पेरणी झाली. आतापर्यंत १८ हजार ७०९ हेक्टरवर पिके घेतली आहेत. खटाव तालुक्यात ८२, तर माणमध्ये ९६ टक्के क्षेत्रावर पेर झाली आहे. खटावमध्ये ३७ हजार, तर माण तालुक्यात ३८ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीखाली आले आहे. फलटणला ७९, वाई तालुक्यात ८४ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. महाबळेश्वर तालुक्यात फक्त ५३ टक्के पेरणी झालेली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfarmingशेतीFarmerशेतकरीRainपाऊस