खंडाळा तालुक्यात आणखी -१९ पतसंस्था अवसायनात

By Admin | Updated: August 1, 2014 23:18 IST2014-08-01T21:26:02+5:302014-08-01T23:18:34+5:30

नऊ संस्थांचे काम बंद

In Khandala taluka, another 19-patrassa body | खंडाळा तालुक्यात आणखी -१९ पतसंस्था अवसायनात

खंडाळा तालुक्यात आणखी -१९ पतसंस्था अवसायनात

शिरवळ : दप्तर दिरंगाई व अनेक वर्षे कामकाज ठप्प ठेवल्याच्या कारणावरून खंडाळा तालुक्यातील जिल्हा कार्यक्षेत्र व तालुका कार्यक्षेत्र असणाऱ्या तब्बल १९ पतसंस्था शासनाने अवसायनात काढल्या आहेत. शासनाचे सहकार धोरण व प्रचलित कायद्यानुसार ही कारवाई झाली आहे. दरम्यान, याच कारणातून यापूर्वी शासनाने ११ पतसंस्था अवसायनात काढल्या आहेत. दरम्यान, या घटनेने खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.यामध्ये जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या संयुक्त विकास मागासगर्वीय औद्योगिक सह. संस्था मर्या., लोणी, सीतरंग नीरा उत्पादक औद्योगिक सह. संस्था मर्या., लोणंद, खंडाळा तालुका कार्यक्षेत्र असणाऱ्या संस्था पुढीलप्रमाणे : विजयाताई बी. शिर्के, पेपर मिल्स कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. शिरवळ, माउली सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्या., बावकलवाडी, माध्यमिक विद्यालय विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था मर्या., मोर्वे, खंडाळा तालुका कांदा उत्पादक सहकारी खरेदी-विक्री संघ मर्या, लोणंद, श्री दत्त वीट उत्पादक सहकारी संस्था मर्या., पाडेगाव, संत गोरोबा कुंभार वीट उत्पादक औद्योगिक सहकारी संस्था मर्या, शिरवळ, श्री महालक्ष्मी महिला स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या., शिरवळ, श्री गणेश स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या., शिरवळ, अष्टविनायक स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या., पिसाळवाडी, खंडाळा तालुका सुरक्षारक्षक सहकारी संस्था मर्या., शिरवळ, लोणंद औद्योगिक वसाहत प्रकल्पग्रस्त, भूमिहीन व भूमिपुत्रांची स्वयंरोजगार संस्था मर्या., लोणंद, प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्र स्वयंरोजगार संस्था मर्या., लोणंद, प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र सहकारी संस्था मर्या,. लोणंद, औद्योगिक प्रशिक्षण संस्था माजी प्रशिक्षणार्थी स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या., लोणंद, खंडाळा स्वयंरोजगार संस्था मर्या., खंडाळा, आझाद स्वयंरोजगार संस्था मर्या., खंडाळा, कृषिभूषण संस्था मर्या, खंडाळा यांचा समावेश आहे.संस्थेचे सभासद, धनको, क्रणको अथवा हितसंबंधित यांनी हरकती अथवा हितसंबंधित यांनी हरकती अथवा आक्षेप असतील तर त्यांनी सहायक निबंधक एस. व्ही. सुद्रीक यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
सहकार कायद्यानुसार संबंधित पतसंस्थांचे दैनंदिन कामकाज, दप्तर दिरंगाई, अद्ययावत वार्षिक लेखापरीक्षण अहवाल, अनेक वर्षांपासून काम बंद ठेवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या दोन व खंडाळा तालुका कार्यक्षेत्र असणाऱ्या नऊ संस्थांचा समावेश आहे.

Web Title: In Khandala taluka, another 19-patrassa body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.