घरपट्टी, अतिक्रमणावरून सभेत खडाजंगी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:46 IST2021-09-04T04:46:48+5:302021-09-04T04:46:48+5:30

‘आरोग्य’च्या विषयावरून वाक्युद्ध पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील खातनिर्मितीवर नगरसेवक वसंत लेवे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. प्रकल्पात खतनिर्मिती होत नसल्याचा ...

Khadpatti in the meeting due to encroachment. | घरपट्टी, अतिक्रमणावरून सभेत खडाजंगी..

घरपट्टी, अतिक्रमणावरून सभेत खडाजंगी..

‘आरोग्य’च्या विषयावरून वाक्युद्ध

पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील खातनिर्मितीवर नगरसेवक वसंत लेवे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. प्रकल्पात खतनिर्मिती होत नसल्याचा दावा करत अधिकारी, कर्मचारी चुकीच्या पद्धतीने घंटागाड्यांची बिले काढत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आरोग्य विभागाकडून जर चुकीच्या पद्धतीने बिले अदा केली जात असतील, तर या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिले.

(चौकट)

सभा मॅनेज आहे का?

वारंवार मागणी करूनही आपले प्रश्न मांडता न आल्याने नगरसेवक वसंत लेवे यांचा पारा भलताच चढला. त्यांनी सभा सुरू असतानाच नगराध्यक्षांना ‘ही सभा मॅनेज आहे का’ असा प्रश्न केला. सभेत केवळ नगराध्यक्ष, विरोधी पक्षनेता व दत्तात्रय बनकर एवढेच लोक बोलत आहेत, असे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

(चौकट)

सभेत कोण काय म्हणाले

वसंत लेवे : पालिका ओपन जिमचा ठराव मंजुरीसाठी घेते; पण पालिकेला क्रीडा अधिकारी आहे का? जो आहे तो गेल्या सहा वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात काम करत आहे, हे कसं काय?

सीता हादगे : शिक्षक बँक ते तहसील कार्यालय या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण फोफावू लागले आहे. हा रस्ता तातडीने अतिक्रमणमुक्त करण्यात यावा.

धनंजय जांभळे : आरोग्य विभागाला कोणी कारभारी आहे का? गुरुवार परजावर अतिक्रमण कोणी केले. मालेश पूल प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रयस्थ समिती नेमा. दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करा.

अशोक मोने : शहरात बोकाळलेली अतिक्रमणे कोणाची? त्याला कोणाचा आशीर्वाद आहे. लिपिकाचे नाव सांगून सर्रास पावत्या फाडल्या जातात. हे कदापि खपवून घेतले जाणार नाही.

शेखर मोरे-पाटील : केवळ गोडोली उद्यानाचे नूतनीकरण कशासाठी? याच उद्यानात लोक फिरायला येतात का? आमच्याकडे देखील म्हातारी माणसं आहेत की त्यांचं काय करायचं?

लोगो : सातारा पालिका फोटो

Web Title: Khadpatti in the meeting due to encroachment.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.