दीडशे वर्षांचा ठेवा झड्यात जपला

By Admin | Updated: June 13, 2016 00:18 IST2016-06-12T22:30:15+5:302016-06-13T00:18:27+5:30

महाबळेश्वरात रिमझिम : पावसापासून सुरक्षेसाठी घरांनाही आच्छादन

Keeping the age of 150 years in the jungle | दीडशे वर्षांचा ठेवा झड्यात जपला

दीडशे वर्षांचा ठेवा झड्यात जपला

महाबळेश्वर : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या महाबळेश्वरात मान्सून सक्रिय झाला नसला तरी रिमझिम सुरू झाली आहे. चार महिने बरसरणाऱ्या मुसळधार पावसापासून ब्रिटिशकालीन इमारती तसेच घरांचे संरक्षण व्हावे यासाठी येथे झड्यांचे आच्छादन लावण्याचे काम सुरू आहे. महाबळेश्वमधील ब्रिटिशकालीन पेटीट लायब्ररीची इमारतही झड्यांच्या आच्छादनात बंदिस्त करण्यात आली. महाबळेश्वरचे वार्षिक पर्जन्यमान सुमारे ४ हजार मिलीमीटर इतके आहे. मुसळधार पावसामुळे येथील ब्रिटिशकालीन इमारती तसेच हॉटेल, बंगले, बाजारपेठेतील दुकाने व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ब्रिटिशकालीन वास्तुंचे जतन करण्यासाठी दरवर्षी पावसापूर्वी सर्व इमारती झड्यांच्या आच्छादनात बंदिस्त केल्या जातात.
सध्या अशा वास्तुंचे संरक्षण करण्यासाठी प्लास्टिकचा कागद व झड्या टाकण्याचे काम सुरू झाले आहे. रविवारी येथील सुमारे दीडशे वर्षे जुनी पेटीट लायब्ररीची इमारत झड्यांच्या आच्छादनात बंदिस्त करण्यात आली. यामुळे ही इमारत सुरक्षित राहणार आहे. (प्रतिनिधी)


पर्यटकांनी लुटला मनसोक्त भिजण्याचा आनंद
उन्हाळी हंगामातील शेवटचा रविवार असल्याने महाबळेश्वरात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. रविवारी दिवसभर पावसाची रिमझिम सुरू असल्याने गारठा निर्माण झाला. पर्यटकांनी पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला.

Web Title: Keeping the age of 150 years in the jungle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.