विकासकामात आडकाठी आणाल तर याद राखा
By Admin | Updated: January 14, 2015 23:40 IST2015-01-14T21:31:27+5:302015-01-14T23:40:55+5:30
जयकुमार गोरे : विरोधकांना इशारा; महिमानगड, बिदाल येथे रस्ता कामाचा प्रारंभ

विकासकामात आडकाठी आणाल तर याद राखा
दहिवडी : लोकप्रतिनिधी या नात्याने आजपर्यंत कोणत्याच विकास कामात राजकारण आणले नाही, मात्र विकासकामात विनाकरण कुणी आडकाठी आणत असेल तर याद राखा. शांत आहे. याचा कुणी गैरअर्थ काढू नका असा इशारा आ. जयकुमार गोरे यांनी विरोधकांना दिला.महीमानगड येथे १३ व्या वित्तआयोगातुन ३० लाख आणि विशेष दुरूस्ती कार्यक्रमातुन ९ लाख अशा ३९ लाख रुपये खर्चाच्या महीमानगड, दिवडी, शिंदीबुद्रुक, बिदाल रस्ल्याच्या कामाच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सोमनाथ भोसले, दादासाहेब काळे, चांगदेव सुर्यवंशी, सरपंच विकास देवकर, लक्ष्मण जाधव, रत्नप्रकाश जोशी आदी उपस्थीत होते.
आ. गोरे पुढे म्हणाले, महिमानगड, दिवडी, बिदाल या रस्त्याचा प्रश्न कित्येक वर्षे प्रलंबीत आहे. ग्रामस्थ, विद्यार्थी, शेतकऱ्यांची अडचण ध्यानात घेवूनच काम मार्गी लावले आहे. विकासकामांशी देणे घेणे नसणारे विरोधक कामात आडकाठी आणायचा प्रयत्न करत आहेत. यापुढे दहशतीचे राजकारण चालु देणार नाही. शांत आहे याचा अर्थ गैरअर्थ काढण्याची चुक कुणी करु नये.
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या आंधळी गण आणि गटातील मताधिक्याने अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. यापुढेही जनतेने असेच सहकार्य करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महिमानगडचा पाणी प्रश्नही लवकरच मार्गी लावु असेही त्यांनी सांगितले. डॉ. रत्नप्रकाश जोशी, चांगदेव सुर्यवंशी, बाबु मुल्ला आदिंनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)