काशिनाथ तांबवेकर यांचा स्मृतिदिनी साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:04 IST2021-01-08T06:04:40+5:302021-01-08T06:04:40+5:30

यावेळी अशोक पाटील, अधिकराव पाटील, पोपटराव पाटील, मारुती पाटील, सतीश कडोले या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. ...

Kashinath Tambvekar's Memorial Day Celebration | काशिनाथ तांबवेकर यांचा स्मृतिदिनी साजरा

काशिनाथ तांबवेकर यांचा स्मृतिदिनी साजरा

यावेळी अशोक पाटील, अधिकराव पाटील, पोपटराव पाटील, मारुती पाटील, सतीश कडोले या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.

माजी केंद्रप्रमुख बाळकृष्ण सुकरे म्हणाले, स्वातंत्र्यसैनिक काशिनाथ तांबवेकर यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असून त्यांच्या विचार व कार्यातून प्रेरणा घेऊन तरुणांनी सामाजिक बांधीलकी जोपासत कार्य करावे. शहीद भगतसिंग मित्रमंडळाने राबविलेले पर्यावरणाबाबतचे अनेक उपक्रम गावासाठी अत्यंत प्रेरणादायी असून, त्यांचा आदर्श इतर गावांतील तरुणांनी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

अवधूत तांबवेकर यांनी प्रास्ताविक केले. सोमनाथ तांबवेकर यांनी सूत्रसंचालन केले. कुलदीप शिनगारे यांनी आभार मानले. प्रवीण आमणे, किशोर कांबळे, सुभाष कांबळे, संदीप पोतदार, भाऊसाहेब पाटील, गणेश आमणे, मुरलीधर आमणे, प्रसाद आमणे यांची उपस्थिती होती.

Web Title: Kashinath Tambvekar's Memorial Day Celebration