शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कास पठार फुलांनी बहरु लागले..!

By admin | Updated: July 12, 2015 21:10 IST

पर्यटकांची गर्दी : निसर्गरम्य दृश्य ; मार्गावरील दर्शनी फलक गायब

पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेला असणारे व पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणारे कास पठार फुलांनी बहरण्यास सुरूवात झाली आहे. पठारावरील नयनरम्य सुंदर अशा फुलांना पाहण्यासाठी जिल्ह्याबरोबरच राज्यातून पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होवू लागली आहे. परंतू साताऱ्याहून कास पठारावर प्रवेश करताना ‘कास पठार आपले सहर्ष स्वागत करीत आहे.’ हा दर्शनी फलक गेल्या महिन्यातील जोरदार वाऱ्याने पडल्यानंतर गायब झाला आहे. त्यामुळे पठाराच्या मध्यावर आल्यावरच आपण कास पठारावर आलो आहोत, अशी जाणीव होत आहे.सातारा जिल्ह्यातील कास पठार हे मोठ्या प्रमाणावर जैवविविधता असलेले ठिकाण आहे. पठारावरील मनाला मोहून टाकणारे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी या परिसरात पर्यटकांची सतत गर्दी असते.या पठाराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे जून ते आॅक्टोबर महिन्याच्या दरम्यान तृण, कंद, वेली तसेच वृक्ष, झुडपे, आर्किड व डबक्यातील वनस्पतींना अत्यंत आकर्षक अशी निळ्या-जांभळ्या लाल पांढऱ्या रंगांची फुले येतात. या पठारावरील सुंदर अशा विविध रंगांच्या फुलांचा कालावधी आठ ते पंधरा दिवसांचा असतो. अशावेळी कास पठाराचे रुप सतत बदलत असते. सध्या पांढऱ्या रंगाची आर्किड फुले येण्यास सुरूवात झाली असल्याने अनेक पर्यटक आपल्या कुटूंबासमवेत दाट धुक्यासह पावसाळी ऋतुचा आनंद घेत या मनमोहक सुंदर अशा फुलांना आपल्या कॅमेऱ्यात टिपताना दिसत आहेत. शनिवार, रविवारी पर्यटक महाविद्यालयीन तरुणार्इंची मोठ्या प्रमाणावर कास पठारावर गर्दी होवू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. (वार्ताहर)विविधरंगी फुले...सह्याद्री पर्वत रांगेतील निसर्गात कास पठार येथे जून ते आॅक्टोबर महिन्यात विविध रंगांची फुले फुलण्यास सुरूवात होते. यामध्ये झाडांवरील आर्किड, गजरा, अमरी, गुलाबदानी, जमिनीवरील आर्किड, भूईचक्र, आर्किड तसेच इतर लहान वनस्पती, झाडे येतात. सध्या पांढऱ्या फुलांनी पठार बहरण्यास सुरूवात झाली आहे.कास पठाराच्या प्रवेशद्वारावर असणारा दर्शनी फलक लवकर लावण्यात यावा. तरच परजिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांना आपण कास पठारावर आलो आहोत, याची जाणीव होईल. -गणेश मोहिते, पर्यटक