कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी कार्यक्रम रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 18:23 IST2021-05-04T18:22:20+5:302021-05-04T18:23:55+5:30

CoronaVirus Satara : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम दरवर्षी ९ मे रोजी संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. यंदा मात्र कोविड १९ मुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता रविवार दि.९ मे रोजी होणारा कर्मवीर नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आह, अशी माहिती रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी दिलेली आहे.

Karmaveer Bhaurao Patil Punyatithi program canceled | कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी कार्यक्रम रद्द

कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी कार्यक्रम रद्द

ठळक मुद्देकर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी कार्यक्रम रद्द कोविड १९ मुळे गंभीर परिस्थिती

सातारा : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम दरवर्षी ९ मे रोजी संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. यंदा मात्र कोविड १९ मुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता रविवार दि.९ मे रोजी होणारा कर्मवीर नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आह, अशी माहिती रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी दिलेली आहे.

कर्मवीर पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने ७ व ८ मे रोजी संस्थेच्या वतीने यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा येथे माध्यमिक विभागाकडील शाखाप्रमुख व धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय पुढील कार्यासाठी शैक्षणिक व्याख्यान सत्रांचे आयोजन व सत्कार कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

Web Title: Karmaveer Bhaurao Patil Punyatithi program canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.