राष्ट्रीय एकात्मतेसाठी धावले कऱ्हाडकर!
By Admin | Updated: December 16, 2014 00:03 IST2014-12-15T22:37:05+5:302014-12-16T00:03:21+5:30
विजय दिवस समारोह : ‘कऱ्हाड दौड’ला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रीय एकात्मतेसाठी धावले कऱ्हाडकर!
कऱ्हाड : बांगलामुक्ती संग्रामातील विजयोत्सवाच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी कऱ्हाडात ‘विजय दिवस’ समारोह सुरू आहे़ सोमवारी सकाळी त्या निमित्ताने ‘कऱ्हाड दौड’ झाली. यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेसाठी हजारो कऱ्हाडकर धावले़ सकाळी ९़३० वाजता दत्त चौकातून कऱ्हाड दौडला प्रारंभ झाला़ उपविभागीय पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या हस्ते झेंडा दाखवून दौडला प्रारंभ झाला़ यावेळी उद्योजक सलीम मुजावर, सत्यनारायण मिणियार, कर्नल संभाजी पाटील, शंकराप्पा संसुद्दी, टी़ डी़ कुंभार, विनायक विभुते, संयोजक प्रमुख महालिंग मुंढेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती़ प्रारंभी दत्त चौकात बेळगावच्या सैनिक बँडने राष्ट्रीय गीतांचे वादन केले़ त्यानंतर ही दौड चावडी चौक, कृष्णा नाका, विजय दिवस चौक, मार्गे शिवाजी स्टेडियमवर पोहोचली़ या दौडीत शिवाजी विद्यालय, विठामाता विद्यालय, पालकर विद्यालय, संत तुकाराम हायस्कूल, टिळक हायस्कूल, यशवंत हायस्कूल, लाहोटी कन्या प्रशाला, महाराष्ट्र हायस्कूल, टिळक ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याशिवाय संगम हेल्थ क्लब, अर्बन स्पोटर्््स क्लब यांच्यासह पोलीस कर्मचारी, जवान, तरुण कार्यकर्तेही कऱ्हाड दौडमध्ये हिरिरीने सहभागी झाले होते़ कऱ्हाड दौड यशस्वी करण्यासाठी एस़ ए़ डांगे, बी़ एस़ खोत, विजय मलजी, जी़ आऱ कणसे, जी़ ए़ कुसूरकर आदींनी परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी) रक्तदान शिबिरास प्रतिसाद विजय दिवस समारोह समिती व गुजर हॉस्पिटलच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरासही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले़ यावेळी कर्नल संभाजीराव पाटील, शंकराप्पा संसुद्दी आदींची प्रमुख उपस्थिती होती़ कऱ्हाड येथे सोमवारी ‘विजय दिवस’च्या पार्श्वभूमीवर ‘कऱ्हाड दौड’ आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांसह युवक व सैन्यदलही सहभागी झाले होते.