शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

कऱ्हाड : विद्यानगरला बिनदप्तराची शाळा-सगाम शाळेचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:54 IST

नुकतेच केंद्र शासनाने मुलांचे दप्तरांचे ओझे कमी करण्याबाबत एक अध्यादेश जारी केला. तथापि मुलांना कितीही सांगितले तरी ते दररोज नको त्या वह्या, पुस्तके भरलेले दप्तर घेऊन शाळेत येतात.

ठळक मुद्देविद्यानगर येथील सद्गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेत मुलांना डिजिटल शिक्षण दिले जात आहे.

कऱ्हाड : नुकतेच केंद्र शासनाने मुलांचे दप्तरांचे ओझे कमी करण्याबाबत एक अध्यादेश जारी केला. तथापि मुलांना कितीही सांगितले तरी ते दररोज नको त्या वह्या, पुस्तके भरलेले दप्तर घेऊन शाळेत येतात. मुलांवर पडत असलेले दप्तराचे ओझे कमी कसे करायचे? हा प्रश्न अनेक शाळांना पडलेला आहे. यावर उपाय म्हणून रयत शिक्षण संस्थेचे गाडगे महाराज प्राथमिक शाळेत ‘बिनदप्तराची शाळा’ ही संकल्पना राबविली गेली आहे. या संकल्पनेमुळे आज विद्यार्थी दप्तराशिवाय शाळेत येत आहेत.

विद्यानगर येथील गाडगे महाराज प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीच्या वर्गात मुलांना डिजिटल शिक्षण दिले जाते. ‘चॉक अँड टॉक’ याला फाटा देत आता खडूशिवाय लिहिता येणारा हा ‘टच स्क्रीन’ बोर्डही वर्गात बसविण्यात आला आहे. शिवाय या बोर्डच्या वापराबाबत ‘रयत’मार्फत प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

या प्रणालीद्वारे दिलेल्या जाणाऱ्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना शाळेत कोणत्याही विषयाची पाठ्यपुस्तके आणण्याची आवश्यकता राहिली नाही. विद्यार्थ्यांना मिळालेली मोफत पाठ्यपुस्तके मुलांना घरच्या अभ्यासासाठी घरीच ठेवण्यास सांगितले आहे. ऐवढेच नाही तर मुलांना दप्तरदेखील आणण्यास प्रतिबंध केला आहे.

शाळेत येताना मुले पाठीवरच्या दप्तरामध्ये प्रमाणापेक्षा जास्त वह्या व पुस्तकेही भरली जातात. त्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी बिनदप्तराची शाळा ही संकल्पना आखली आहे.एकाच पिशवीत डबा, एक वही अन् पेनआज विद्यार्थी डब्याच्या पिशवीतच सर्व विषयांसाठी एकच वही, एक पेन व जेवणाचा डबा एवढेच साहित्य शाळेत घेऊन येत आहेत. त्यामुळे त्यांना शाळेत येताना ओझे असलेले दप्तर घेऊन येण्याची आवश्यकता राहिलेली नाही. 

‘दप्तराचे ओझे’ या समस्येवर आम्ही प्रभावी उपाययोजना करत असून, ‘बिनदप्तराची शाळा’ हा त्यापैकीच एक भाग आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेला हा उपक्रम आता इतर वर्गांसाठी देखील राबवित आहोत.- सुनीता जाधव, मुख्याध्यापिका,सद्गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळा 

टॅग्स :SchoolशाळाSatara areaसातारा परिसर