शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यासह कऱ्हाड, खंडाळ्यात मुसळधार पाऊस; नागरिकांची उडाली तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 12:08 IST

शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

सातारा : साताऱ्यासह खंडाळा परिसरात मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे नागरिकांची चांगलीच पळापळ झाली. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे वातावरणात गरमी जाणवत होती. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास पाऊस झाल्यामुळे वातावरणात बदल होऊन गारवा निर्माण झाला.सातारा परिसरात परतीचा पाऊस कमी पडतो. तर माण, खटाव,फलटण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पडत असतो. मात्र यंदा साताऱ्यातही परतीचा पाऊस पडत आहे. साताऱ्यात मंगळवारी सकाळपासून ढग जमा झाले होते. यामुळे यवतेश्वर घाट ढगात झाकून गेला होता. त्यातच दुपारी साडेतीनच्या सुमारास अंधारून आले. त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे नागरिकांची मात्र चांगलीच पळापळ झाली. खंडाळा परिसरातही चांगला पाऊस झाला. यामुळे पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात मात्र संथगतीने वाहतूक सुरू होती.कऱ्हाडला जोरदार पावसाने झोडपलेकऱ्हाड शहरासह परिसराला जोरदार पावसाने झोडपून काढले. तासभर पडलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. शाहू चौकासह भेदा चौक मार्गावर पाणी साचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. तसेच किरकोळ विक्रेत्यांचे साहित्य भिजून नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.शेतकऱ्यांनी भांगलणीसह इतर मशागतीची कामे हाती घेतली होती. शेतीच्या कामात शेतकरी व्यस्त होते. सोयाबीन तसेच भुईमुगाची काढणीही जवळ आली आहे. त्यातच मंगळवारी रात्री जोरदार पावसाने झोडपून काढले. रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला पाऊस उशिरापर्यंत सुरूच होता.जोरदार पावसामुळे शहरातील शाहू चौक ते जुन्या कोयना पुलाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. तसेच भेदा चौक ते पंचायत समिती मार्गावरही पाणी साचल्यामुळे चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागली. शहरातील इतर सखल भागांतील रस्त्यावरही पाणी साचले होते.  किरकोळ विक्रेत्यांचे साहित्य भिजून नुकसान झाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसFarmerशेतकरी