कऱ्हाड विमानतळाचे विस्तारीकरण व नाईट लँडिंगच्या कामांना प्राधान्य, पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 01:04 PM2024-01-31T13:04:17+5:302024-01-31T13:04:41+5:30

सातारा : कऱ्हाड विमानतळाचे एका वर्षात विस्तारीकरण आणि रात्री विमान सेवा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील ...

Karad Airport Expansion and Night Landing Works Priority, Guardian Minister Shambhuraj Desai informed | कऱ्हाड विमानतळाचे विस्तारीकरण व नाईट लँडिंगच्या कामांना प्राधान्य, पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली माहिती 

कऱ्हाड विमानतळाचे विस्तारीकरण व नाईट लँडिंगच्या कामांना प्राधान्य, पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली माहिती 

सातारा : कऱ्हाड विमानतळाचे एका वर्षात विस्तारीकरण आणि रात्री विमान सेवा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटन, उद्योग वाढीला चालना मिळणार आहे, अशी माहिती पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.

कऱ्हाड विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, विमानतळ प्राधिकरणाचे विभागीय व्यवस्थापक संतोष नलावडे, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, आदी उपस्थित होते.

शंभुराज देसाई म्हणाले, कऱ्हाड विमानतळ विस्तारीकरण व नाईट लंडिंग हा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. २०१२-१३ मध्ये विस्तारीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्याची असणारी १ हजार २८० मीटरची धावपट्टी वाढवून ती १ हजार ७०० मीटर करण्यात येणार आहे. विस्तारीकरणासाठी ४८ हेक्टरचे भूसंपादन झाले आहे. जवळपास ६२ टक्के खातेदारांना भूसंपादनपोटी मिळणारा निधी शासनाने वितरित केला आहे. उर्वरित खातेदारांना पंधरा दिवसांची नोटीस देऊन भूसंपादनाची भरपाई स्वीकारण्याचे आवाहनही पालकमंत्री देसाई यांनी केले.

यावेळी एअरपोर्ट ॲथाॅरिटी ऑफ इंडिया यांनी निर्धारित केलेल्या नियमानुसार जी बांधकामे, टॉवर्स अडथळा निर्माण करणारी ठरतील, ती अतिक्रमणे काढण्याबाबत कारवाई करण्याचे निर्देशही या बैठकीत पालकमंत्री देसाई यांनी दिले.

भरपाई न स्वीकारल्यास रकमेचा कोर्टात भरणा

खातेदारांनी भरपाईची रक्कम न स्वीकारल्यास रकमेचा भरणा कोर्टात करण्यात येऊन जमीन ताब्यात घेण्यात येईल. संपादित जमिनीस लवकरात लवकर शासनाचे नाव लावण्याच्या कामास प्राधान्य देण्याचा निर्णय पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत झाला आहे.

Web Title: Karad Airport Expansion and Night Landing Works Priority, Guardian Minister Shambhuraj Desai informed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.