शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

‘काकां’ची निवृत्ती आता नव्या नेतृत्वाचा ‘उदय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 23:00 IST

प्रमोद सुकरे।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : ‘येणारी विधानसभा निवडणूक मी लढविणार नाही,’ अशी जाहीर स्पष्टोक्ती माजीमंत्री विलासराव पाटील काकांनी नुकतीच एका कार्यक्रमात दिलीय. खरंतर त्यामुळे त्यांच्या काही जुन्या निष्ठावंतांच्यात अस्वस्थताही पसरलीय म्हणे. पण त्यांचे सुपुत्र वकीलदादांनी मात्र उमेदवार कोण हे महत्त्वाचे नाही. पण रयत संघटनेच्या ताब्यात पुन्हा आमदारकी आणण्यासाठी कामाला लागा, ...

प्रमोद सुकरे।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : ‘येणारी विधानसभा निवडणूक मी लढविणार नाही,’ अशी जाहीर स्पष्टोक्ती माजीमंत्री विलासराव पाटील काकांनी नुकतीच एका कार्यक्रमात दिलीय. खरंतर त्यामुळे त्यांच्या काही जुन्या निष्ठावंतांच्यात अस्वस्थताही पसरलीय म्हणे. पण त्यांचे सुपुत्र वकीलदादांनी मात्र उमेदवार कोण हे महत्त्वाचे नाही. पण रयत संघटनेच्या ताब्यात पुन्हा आमदारकी आणण्यासाठी कामाला लागा, असे कार्यकर्त्यांना आवाहन केलंय. परिणामी दक्षिणच्या राजकारणात उंडाळकर ‘काकां’ची राजकीय एक्झीट अन् आता नव्या नेतृत्वाचा ‘उदय’ याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.कºहाड दक्षिणच्याच नव्हे तर अनेक वर्षे जिल्ह्याच्या राजकारणावर गारूड घालणारं एक नेतृत्व म्हणजे विलासराव पाटील-उंडाळकर. कºहाड दक्षिण विधानसभा मतदार संघातून एकदा नव्हे तर तब्बल सातवेळा विधानसभेची निवडणूक जिंकून एक वेगळा इतिहास रचणारे नेतृत्व म्हणजे विलासराव उंडाळकर. जिल्ह्याच्या राजकारणात कधीही कितीही प्रसंग आला बाका तर त्यावर उपाय काढणारे नेतृत्व म्हणजे विकासकाका अशी त्यांची एक काळ ख्याती होती.मात्र, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर ‘पृथ्वी’राज अवतरल्यानंतर उंडाळकरांच्या राजकारणाला खऱ्या अर्थाने घरघर लागली, असे म्हणावे लागेल.गत विधानसभा निवडणुकीत विजयाची सप्तपदी पार पाडलेल्या उंडाळकर काकांना काँगे्रसच्या उमेदवारीपासून ‘हात’भर अंतरावर ठेवण्यात आले. मात्र, हे पचनी न पडलेल्या उंडाळकरांनी थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधातच दंड थोपटले. त्यांच्या बंडखोरीच्या गाडीला राष्ट्रवादीने ‘चावी’ दिली. तर पृथ्वीबाबांच्या गाडीतून उतरलेल्या भोसले बाबांनी ‘कमळ’ हातात घेतल्याने तिरंगी लढतीत पृथ्वीबाबांनी बाजी मारली. आणि उंडाळकर गट दक्षिणेतल्या राजकारणातही बॅकफूटवर गेला. तेव्हापासून उंडाळकर गटाच्या आमदारकी पुन्हाताब्यात घेण्यासाठी जोरबैठका सुरू आहेत.त्याचाच एक भाग म्हणून विलासकाका उंडाळकरांच्या सार्वजनिक जीवनाची पन्नास वर्षे असा एक कार्यक्रम आयोजित करून त्याला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख पाहुणे म्हणून असणारी उपस्थिती बोलकी आहे.त्याही पुढे जाऊन स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त उंडाळे येथील आयोजित कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांची असणारी उपस्थितीही बरंच काही सांगून जातं.आमदार रयत संघटनेचा की विचाराचा..येणाºया विधानसभा निवडणुकीत आमदार आपलाच असेल, असे उंडाळकर सांगतायंत. पण हा आमदार रयत संघटनेचा, संघटनेच्या विचाराचा की रयत संघटनेला बरोबर घेणारा असेल, याबाबत तालुक्याच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.‘नियोजन’ चुकलं...विलासराव पाटील-उंडाळकर यांचे राजकीय वारसदार म्हणून अ‍ॅड. उदय पाटील यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी गत जिल्हा परिषद निवडणुकीत येळगाव गटातून सदस्य म्हणून विजयी होऊन आपली एन्ट्री केली. मात्र, जिल्हा नियोजन समितीपासून त्यांना दूरच ठेवण्यात आलं. त्यामुळे विलासराव उंडाळकरांचे राजकीय नियोजन चुकल्याची चर्चा आजही तालुक्यात सुरू आहे.‘बाबा’ अन् ‘काका’ एकत्रीकरणाची चर्चाजातीवादी पक्षांना रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र आले पाहिजे, अशी हाक काँगे्रसने दिली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत गटबाजी तर काँग्रेसमध्ये असूच नये, अशी ज्येष्ठांची भावना आहे. उंडाळकरही ‘मी काँगे्रस विचाराचाच पाईक आहे,’ असेच नेहमी सांगतात. त्यामुळे दक्षिणेतील काँगे्रसचे ‘बाबा’ ‘काका’ गट एकत्रित येणार, अशी चर्चा आहे.एकमेकांवरील टीका टाळली जातेयकºहाड दक्षिण विधानसभा मतदार संघात आमदार पृथ्वीराज चव्हाण व माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर दोघांचेही कार्यक्रम सध्या सुरू आहे. यापूर्वी यांच्या व्यासपीठावरून परस्परांवर टीकेची झोड उठवली जायची. सध्या मात्र, दोघांच्याही व्यासपीठावरून फक्त भाजप आणि सेनेला टार्गेट केल्याचे पाहायला मिळत आहे.