शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Satara: डोळ्यात भंडारा टाकून चार भाविकांचे दागिने हिसकावले, पाल यात्रेतील घटना

By दत्ता यादव | Updated: January 23, 2024 14:27 IST

सातारा : पाल, ता. कऱ्हाड येथील यात्रेत 'येळकोट येळकोट जय मल्हार'चा जयघोष अन् भंडाऱ्याची उधळण होत असतानाच दुसरीकडे मात्र, चार भाविकांच्या डोळ्यात भंडारा टाकून ...

सातारा : पाल, ता. कऱ्हाड येथील यात्रेत 'येळकोट येळकोट जय मल्हार'चा जयघोष अन् भंडाऱ्याची उधळण होत असतानाच दुसरीकडे मात्र, चार भाविकांच्या डोळ्यात भंडारा टाकून हातोहात तब्बल तीन लाखांचे दागिने गायब करण्यात आले. ही घटना दि. २२ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.उंब्रज पोलिस ठाण्यात अनोळखी पाच जणांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाल यात्रेचा सोमवारी मुख्य दिवस होता. या यात्रेला राज्यभरातून लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास खंडोबा -म्हाळसा विवाह सोहळा पार पडत असतानाच भंडारा व खोबऱ्यांच्या तुकड्यांची उधळण केली जात होती. त्याचवेळी भाविकांच्या डोळ्यात भंडारा टाकून त्यांचे दागिने लुटले जात होते. खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळा झाल्यानंतर चार भाविकांचे दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. संगीता राजन कांबळे (वय ५०, रा. गुरुवार पेठ, सातारा) यांच्या गळ्यातील १६ ग्रॅम वजनाचे मिनी मंगळसूत्र हिसकावून नेले. अमर रंगराव पाटील (वय ३५, रा. आसगाव, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) यांच्या गळ्यातील २६ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावली. त्याचबरोबर आक्काताई शिवाजी भवर (रा. वेजेगाव, ता. खानापूर, जि. सांगली) यांच्याही गळ्यातील ६८ हजार रुपये किमतीची साेन्याची मण्याची माळ तर सतीश आनंदराव माेरे (रा. किणी, ता. हातकणंगल, जि. कोल्हापूर) यांच्या गळ्यातील २१ ग्रॅम ५०० मिली वजनाची सुमारे १ लाख १४ हजार ४८७ रुपयांची साेन्याची चेन हिसकावून नेली. अशा प्रकारे एकूण ६ तोळ्यांचे सुमारे ३ लाख २ हजार ४८७ रुपयांचे दागिने हिसकावून नेण्यात आले. या प्रकारामुळे भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली. ज्यांना तक्रार देणे शक्य होते. अशा भाविकांनी उंब्रज पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. आणखी बऱ्याच लोकांचे दागिने चोरीस गेल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे हे अधिक तपास करीत आहेत.

पोलिसांसमोर तपासाचे आव्हानपाल यात्रेत लाखो भाविकांची गर्दी लोटली होती. त्यातच भाविकांच्या अंगावर भंडारा असल्यामुळे चेहरे ओळखून येत नव्हते. त्यामुळे या यात्रेत दागिने चोरणाऱ्या चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांसमोर माेठे आव्हान असणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस